आषाढी वारी करून विशेष एसटीने घरी परतणाऱ्या वारकऱ्यांचे हाल, पेट्रोल पंपावर 6 तास प्रतीक्षा 

एका गाडीला जवळपास 25 मिनिटे सीएनजी भरण्यासाठी वेळ लागतो. मात्र वारकऱ्यांना जवळपास पाच ते सहा तास सीएनजी भरण्यासाठी थांबावं लागत असल्याचं वारकऱ्यांचे म्हणणं आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

आषाढी वारी (Ashadhi Wari 2025) करून परतीच्या प्रवासाला लागलेल्या नागरिकांचे हाल झाल्याची घटना समोर आली आहे. दुपारी 2 ते सायंकाळपर्यंत वारकरी सासवड इथे एका पेट्रोल पंपावर असल्याचं समोर आलं आहे. महामंडळाने वारकऱ्यांसाठी ज्या विशेष गाड्या सोडल्या त्या गाड्या सासवडमध्येच अडकून पडल्या होत्या, अशी माहिती आहे. 

आषाढी वारी उरकून पंढरपूरहुन पुण्याकडे जाताना सासवड येथे बसमध्ये सीएनजी भरला जातो. परंतु हा सीएनजी भरण्यास विलंब झाल्याने वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर मोठ्या संख्येने वारकरी एसटी बसने जातात. मात्र सीएनजी पंपावर मोठी रांग लागल्याने वारकऱ्यांना हा मनस्ताप सहन करावा लागतोय. 

नक्की वाचा - Pandharpur News : पांडुरंगाच्या दरबारी वारकऱ्याला रक्त येईपर्यंत मारहाण; संतापजनक Video

एका गाडीला जवळपास 25 मिनिटे सीएनजी भरण्यासाठी वेळ लागतो. मात्र वारकऱ्यांना जवळपास पाच ते सहा तास सीएनजी भरण्यासाठी थांबावं लागत असल्याचं वारकऱ्यांचे म्हणणं आहे. सासवड बस स्थानकातून मुंबई पुण्याकडे जाणारे मोठ्या प्रमाणात वारकरी आहेत आणि त्यामुळे वारकऱ्यांची मोठी गैरसोय होती असा आरोप वारकऱ्यांचा आहे. दरम्यान याबाबत एसटी महामंडळाकडून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. 

Topics mentioned in this article