साजन ढाबे, वाशिम:
Ravikant Tupakar News: शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आपल्या धाडसी आंदोलनांसाठी आणि बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्यांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. उद्धव ठाकरे अन एकनाथ शिंदे एकमेकांशी किती भांडतात, मात्र दिल्लीत एकाच ताटात जेवतात. एकाची बियर अन दुसऱ्याचा चकणा असा खळबळजनक विधान रविकांत तुपकर यांनी केले आहे.
Jalna Crime: नाशिक, अमरावतीनंतर जालना हादरलं! साहिल अन्सारीचं विकृत कृत्य; कॉलेज तरुणीसोबत काय घडलं?
काय म्हणाले रविकांत तुपकर?
"सर्वांच्या संघटना असतात, ग्रामसेवकाची संघटना, पोलीस पाटलांची संघटना, आशा सेवकांची संघटना. सरपंच वेगवेगळ्या पक्षातून निवडून येतात त्यांचीही संघटना आहे. आमदार वेगवेगल्या पक्षाचे आहेत मात्र मुबंईत एका ताटात काला करून खातात, मी जवळून पाहिलंय. हे उद्धव ठाकरे अन एकनाथ शिंदे एकमेकांशी किती भांडतात, मात्र दिल्लीत एकाच ताटात काला करुन खातात जेवतात. एकाची बियर अन दुसऱ्याचा चकणा, पाहिलं अन् मागच्या आठड्यात? तुम्हाला जेवायला गेलेलं चालतं आम्हाला शेजारच्या घरी गेलेलं चालत नाही का?" असं रविकांत तुपकर यावेळी म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्यांची विनाअट सरसकट कर्जमाफी करावी यासाठी वाशिम जिल्ह्यातील अडोळी गावातील शेतकऱ्यांनी “गाव विक्रीसाठी काढलं होतं आणि ठिय्या आंदोलनही सुरू केलं होतं. मात्र प्रशासनानं याची दाखल नं घेतल्यानं शेतकरी सतीश इढोळे यांनी ११ एप्रिलपासून आमरण उपोषण सुरु केलं होते. बुधवारीू शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनाला भेट देऊन आमरण उपोषण सोडवलं आणि मागण्या मान्य करण्यासाठी सरकार आठ दिवसांची मुदत देत मागण्या मान्य नं झाल्यास राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी एक खळबळजनक विधान केले.
Dombivli News: डोंबिवलीत भाजी मार्केटमध्ये मोठी कारवाई! तब्बल 114 दुकाने सील; नेमकं काय सुरु होतं?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world