जाहिरात

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले! मतदान, निकालाच्या तारखेसह वाचा सर्व माहिती

Vidhan Parishad Election 2026: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. 13 मे रोजी 9 सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. कधी होणार मतदान आणि मतमोजणी? वाचा सविस्तर बातमी.

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले! मतदान, निकालाच्या तारखेसह वाचा सर्व माहिती
"Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या निवडणुकीची तारीख जाहीर"
NDTV

Vidhan Parishad Election 2026: राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी (16 एप्रिल) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 13 मे 2026 रोजी विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी 12 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक दिग्गजांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे या जागांवर पुन्हा कोणाची वर्णी लागणार आणि राजकीय समीकरणे कशी बदलणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया कधी असणार? जाणून वेळ आणि तारीख

  1. निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026 (गुरुवार)  
  2. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल2026 (गुरुवार)  
  3. उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026 (शनिवार) 
  4. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026 (सोमवार) 
  5. मतदानाची तारीख: 12 मे 2026 (मंगळवार) 
  6. मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
  7. मतमोजणी: 12 मे 2026 (मंगळवार) संध्याकाळी 5 वाजता
  8. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026 (बुधवार)

(नक्की वाचा: BMC Officers Transfer: अश्विनी भिडे ॲक्शन मोडवर! 15 दिवसांत सहाय्यक आयुक्तांसह 4 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या)

हे 9 सदस्य होणार निवृत्त

  1. संजय केणेकर
  2. नीलम गोऱ्हे 
  3. उद्धव ठाकरे
  4. संदीप जोशी
  5. दादाराव केचे
  6. अमोल मिटकरी
  7. रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील
  8. राजेश राठोड
  9. शशिकांत शिंदे
Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

विधानसभेच्या आमदारांमार्फत हे सदस्य निवडून दिले जातात, त्यामुळे राज्यातील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com