साजन ढाबे, प्रतिनिधी
Washim News : महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या वक्तव्याची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. वाशिम येथील एका कार्यक्रमात त्यांनी लाडक्या बहिणींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.
लाडकी बहीण योजनेत मिळालेले पैसै शॉपिंगमध्ये खर्च करू नका, असा सल्ला आदिती तटकरे यांनी या कार्यक्रमादरम्यान दिला. लाडक्या बहिणींना योजनेतील रकमेचा लाभ होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केट जाम गजबजलेलं असतं असं ते यावेळी म्हणाले. वाशिम येथील महिला आणि बालविकास विभागाच्या अहिल्या भवनच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्य आयोजित संवाद कार्यक्रमात आदिती तटकरे बोलत होत्या. आदिती तटकरे यांच्या या वक्ताव्यानंतर आता वाद उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
लाडकी बहीण योजनेत मिळालेले १५०० रुपये शॉपिंगमध्ये खर्च करू नका. शहरातील व्यापारी लाडकी बहीण योजनेचा लाभ कधी होईल अशी विचारणा करतात. लाडक्या बहिणींपेक्षा व्यापारी याबाबत अधिक विचारणा करतात. मी याबाबत एक-दोन वेळा व्यापाऱ्यांना याबाबत विचारणा केली, त्यांच्या घरातील कोणी लाभार्थी असल्याचं मला वाटलं. मात्र व्यापारी म्हणाले, ज्या दिवशी लाडक्या बहीण योजनेच्या रकमेचा लाभ होतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केट जाम गजबजलेलं असतं.