Water Crises: मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई, राज्यातील धरणांच्या पाणी पातळीतही मोठी घट

Marathwada Water Shortage : मराठवाड्यात असलेल्या सर्व लघु, मध्यम आणि मोठ्या 920 धरणांमध्ये फक्त 37.88 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Water Crises in Maharashtra : राज्यातील अनेक भागात आतापासून पाणीटंचाई जाणवत आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात देखील वेगाने घट होत आहे. मराठवाड्यात तर काही भागात भीषण पाणीटंचाईचे आहेत. नागरिकांना भर उन्हात पायपीट करत डोक्यावर पाणी आणावं लागत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 
मराठवाड्यात असलेल्या सर्व लघु, मध्यम आणि मोठ्या 920 धरणांमध्ये फक्त 37.88 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यावर पाणीटंचाईचे महासंकट पाहायला मिळू शकते. मराठवाड्यातील धरणांमध्ये सध्या किती पाणीसाठा आहे, यावर एक नजर टाकूया.

मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा

  • जायकवाडी : 44.93 टक्के 
  • निम्न दुधना : 37.39 टक्के
  • येलदरी : 57.29 टक्के
  • सिद्धेश्‍वर : 46.65 टक्के
  • माजलगाव : 19.98 टक्के
  • मांजरा : 34.69 टक्के
  • पैनगंगा (ईसापूर) : 52.35 टक्के
  • मनार : 46.90 टक्के
  • निम्न तेरणा : 56.67 टक्के
  • विष्णुपुरी : 32.90 टक्के
  • सीना कोळेगाव : 05.05 टक्के

ट्रेंडिंग बातमी -  Cidco News: सिडकोसमोर मोठे संकट! 21,000 विजेत्यां पैकी किती जणांनी भरली कन्फर्मेशन अमाऊंट?

राज्यातील धरणांमधील पाणीसाठा (विभागनिहाय)

नागपूर 
धरणांची संख्या : 383
पाणीसाठा : 38.96 टक्के

अमरावती 
धरणांची संख्या : 264
पाणीसाठा : 48.78 टक्के

छत्रपती संभाजीनगर 
धरणांची संख्या : 920
पाणीसाठा : 37.88 टक्के

नाशिक 
धरणांची संख्या : 537
पाणीसाठा : 42.55 टक्के

पुणे 
धरणांची संख्या : 720
पाणीसाठा : 32.41 टक्के

कोकण 
धरणांची संख्या : 173
पाणीसाठा : 48.10 टक्के

Topics mentioned in this article