पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाणीगळती, करणार ही उपाययोजना

पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सोमवारी (10 जून) पाणी झिरपत असल्याचे निदर्शनास आले. काय आहे यामागील कारण...

Advertisement
Read Time: 2 mins

पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सोमवारी (10 जून) पाणी झिरपत असल्याचे निदर्शनास आले. अतिवृष्टीमुळे मंदिराच्या काही भागामध्ये पाणी झिरपत असल्याचा दुजोरा मंदिर व्यवस्थापनानेही दिला आहे. या समस्येवर लवकरच उपाययोजना करण्यात येईल, अशी माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

(नक्की वाचा: मान्सून आणि... ! महाराष्ट्रभरात पावसाची तुफान बॅटिंग; 'या' जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट)

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू असल्याने काही भागामध्ये गळती सुरू आहे. यावर तोडगा म्हणून लवकरच वॉटरप्रुफिंगचे काम केले जाणार आहे. दरम्यान मंदिरामध्ये गळती सुरू असल्याने कामाच्या दर्जेबाबत शंका उपस्थित केली जात आहे. सध्या 73 कोटी रुपये खर्चून मंदिर विकास आराखड्याचे काम सुरू आहे. अशातच मंदिराला गळती लागल्याने जुने पुरातन बांधकामाची अधिक मजबुतीने डागडुजी करण्याची गरज असल्याचे आता बोलले जात आहे.

(नक्की वाचा: पावसात मंदिराशेजारी मित्रासोबत गप्पा मारत उभा होता अन् आला मृत्यू; धक्कादायक प्रकार समोर)

2 जूनला सुरू करण्यात आले होते पदस्पर्श दर्शन

पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील जतन आणि संवर्धनाच्या कामानंतर तब्बल 79 दिवसांनंतर 2 जून 2024 रोजी पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले होते. मंदिराचे पुरातन आणि प्राचीन रूप भाविकांना अनुभवायला मिळत होते. मंदिरातील कामामुळे 15 मार्चपासून विठोबाचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले होते. दरम्यान आता मंदिरामध्ये सुरू असलेल्या गळतीमुळे भाविकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची माहिती आहे.  

(नक्की वाचा: धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस, लोकांच्या घरात शिरले नाल्याचे पाणी)

Pandharpur Mandir Leakage | पंढरपुरात सलग चार दिवस पाऊस, पुरातन विठ्ठल मंदिराला लागली गळती