जाहिरात

Nagpur Water Cut: नागपूरकरांसाठी मोठी बातमी! 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद; कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

महापालिकेचे पेंच जलशुद्धीकरण प्रकल्प ३६ तास बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील नऊ झोनमधील अनेक वस्त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. 

Nagpur Water Cut:  नागपूरकरांसाठी मोठी बातमी! 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद; कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Nagpur Water Cut News:  नागपूरकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. उद्यापासून पुढील दोन दिवस शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सदर परिसरातील मुख्य जलवाहिनीवर वॉल्व्ह बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम ७ एप्रिल सकाळी १० वाजल्यापासून ते ८ एप्रिल रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत महापालिकेचे पेंच जलशुद्धीकरण प्रकल्प ३६ तास बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील नऊ झोनमधील अनेक वस्त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. 

Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट! बड्या अधिकाऱ्यांसह बिल्डरही अडकणार? 300 कोटींची जमीन अन्...

कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा बंद? 

  • लक्ष्मीनगर झोनमध्ये पाणीपुरवठा बंद
  • लक्ष्मीनगर, गायत्रीनगर, प्रतापनगर, खामला प्रभावित
  • टाकळी सिम, जयताळा, त्रिमूर्तीनगर भागात पाणी बंद
  • जलकुंभातून पुरवठा थांबणार
  • धरमपेठ झोनमध्येही परिणाम रामनगर, सिव्हिल लाईन, सेमिनरी हिल परिसर प्रभावित
  • फुटाळा लाईन, रायफल लाईन, टेकडी वाडी भागात पाणी बंद बर्डी आणि धंतोली परिसरातही टंचाई
  • हनुमाननगर झोनमध्ये पाणीपुरवठा बंद चिंचभवन, ओंकारनगर, हुडकेश्वर प्रभावित
  • श्रीनगर, नालंदानगर, दुमजली भागातही परिणाम, अनेक जलकुंभ क्षेत्रांमध्ये पाणी बंद
  • नेहरूनगर झोनमध्ये टंचाई सक्करदरा, बिडीपेठ, बालाजीनगर प्रभावित
  • गांधीबाग झोनमध्ये पाणीपुरवठा खंडित सीताबर्डी, किल्ला महाल, मेडिकल परिसर प्रभावित
  • सतरंजीपुरा झोनमध्येही पाणी बंद बोरियापुरा, रेल्वे परिसर, वाहन ठिकाणा प्रभावित
  • आशीनगर झोनमध्ये नारा, नारी, जरीपटका भाग प्रभावित , नागरिकांनी पाण्याची साठवण करण्याचे आवाहन
  • मंगळवारी झोनमध्ये गिट्टीखदान, गोरेवाडा प्रभावित राजनगर आणि सदर परिसरातही पाणी बंद
  • महापालिकेचे नागरिकांना आवाहन आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवावे..

Nagpur News: "नोकरीच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावलं अन्...", नागपूरमधील धक्कादायक प्रकार 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com