धनंजय मुंडेंची संपत्ती 5 वर्षात दुप्पट; महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या संपत्तीत कितीने झाली वाढ?

महायुतीच्या नेत्यांची किती आहे संपत्ती? गेल्या पाच वर्षात कितीने झाली वाढ?

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

परळी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी दिलेल्या शपथपत्रात त्यांची संपत्ती 53.80 कोटी असल्याचे (Wealth of BJP leaders) नमूद केले आहे. 2019 साली मुंडे यांची संपत्ती 23 कोटी इतकी होती. यामध्ये धनंजय मुंडे यांच्या नावावर 15 कोटीं 55 लाख 5 हजार 105 रुपयांची विविध वाहने आहेत. यामध्ये बुलेटपासून टँकरपर्यंत एकूण 7 वाहनांचा समावेश आहे तर 7 लाख 3000 रुपयांचे 190 ग्रॅम सोने आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे 31 लाख 78 हजार 675 रुपयांची दोन वाहने आहेत. याबरोबर 22 लाख 90 हजारांचे 620 ग्रॅम सोने व 72 हजारांची दीड किलो चांदीचा समावेश आहे.

महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबत दिलेल्या शपथपत्रात त्यांनी आपल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील दिला आहे. त्यात त्यांच्याकडे एकूण 6 कोटी 85 लाख 27 हजार 601 रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

नक्की वाचा - छगन भुजबळांच्या नावावर ट्रॅक्टर तर बायकोच्या नावावर पिकअप, महागड्या गाड्या कोणाच्या नावावर?

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी काल येवला मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरलाय. दरम्यान या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मालमत्तेचे विवरण सादर केले असून त्यानूसार भुजबळ हे 12.50 कोटींचे धनी आहेत. त्यांची वयक्तिक जंगम मालमत्ता 1 कोटी 32 लाख 66 हजार 235 रुपये आहे. स्थावर मालमत्तेचे मुल्य 11 कोटी 20 लाख 41 हजार रुपये आहे. पत्नी मिना भुजबळ यांच्या नावे 2 कोटी 38 लाख 29 हजार 52 रूपये जंगम तसेच 16 काेटी 53 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. स्वतःकडे 585 ग्रॅम तर पत्नीकडे 455 ग्रॅमचे साेन आहे.  भुजबळांच्या नावावर ट्रॅक्टर तर मिना यांच्याकडे पिकअप वाहन आहे. विविध ठिकाणी मालमत्ता असून त्यामध्ये रहिवासी आणि शेत जमीनींचा समावेश आहे. भुजबळ दाम्पत्याच्या डोक्यावर 45 लाख 66 हजार 250 रुपयांचे कर्ज आहे. दरम्यान भुजबळांच्या नावावर विविध केसेसही दाखल असल्याचं या प्रतिज्ञापत्रात दिसून येतय.

छगन भुजबळांची संपत्ती किती?

11 कोटी 20 लाख 88 हजारांची स्थावर मालमत्ता

पत्नीच्या नावावर 16 कोटी 53 लाखांची मालमत्ता

पाच वर्षांत भुजबळांच्या मालमत्तेत 82 लाखांची वाढ

पत्नीच्या मालमत्तेत 8 कोटी 35 लाखांची वाढ 

2019 साली भुजबळांच्या स्थावर मालमत्ता 11 कोटी 38 लाख 14 हजार 

पत्नी मीना यांची 16 कोटी 18 लाख रुपयांची मालमत्ता

मंगल प्रभात लोढांची संपत्ती किती?

एकूण संपत्ती- 436 कोटी

जंगम  - 123 कोटी 38 लाख, 98 हजार 588

पत्नीच्या नावे- 10 कोटी 28 लाख 75 हजार 340

स्थावर- 125 कोटी 54 लाख 49 हजार 707

कर्ज- 182 कोटी 93 लाख 73 हजार 518

शेअर्सची किंमत- 4 कोटी 4 लाख 94 हजार 633

पत्नीकडे शेअर्स- 4 कोटी 04 लाख 54 हजार 638

सोने- 6 कोटी 76 लाख 86 हजार 552

पत्नीकडे सोने- 8 कोटी 12 लाख 23 हजार 449
 

तानाजी सावंतांची संपत्ती किती?

जंगम मालमत्ता- 128 कोटी 66 लाख

पत्नीकडे 1 कोटी 14 लाख

2019 ला 127 कोटी 15 लाख 

स्थावर मालमत्ता- 79 कोटी 70 लाख

पत्नीकडे -  25 कोटी 70 लाख

2019
स्थावर मालमत्ता- 53 कोटी 56 लाख

पत्नीकडे- 5 कोटी 68 लाख

मुलांकडे- 11 कोटी

5 वर्षात 50 कोटी रुपये वाढले