बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तर अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश्य स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात थंडीला सुरुवात झाली असली तरी पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने थंडीचा मुक्काम फक्त दोनच दिवस राहणार असून 23 पासून पुन्हा ढगाळ वातावरण अन् पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, पुणे शहराचा पारा बुधवारी राज्यात निचांकी ठरला. शिवाजीनगरचे तापमान 12.2 इतके सर्वांत कमी नोंदवले गेले.
पुण्यात सर्वात कमी तापमानांची नोंद करण्यात आली असून पुण्यात 12 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील सर्वात कमी तापमान पुण्यात असून राज्यातील किमान तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. पुढील आठवड्यात तापमानात आणखीन घट होणार असून गेल्या रविवार पासून पुण्यात थंडीचा कडाका वाढत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बंगालच्या उपसागरात बुधवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला, त्यामुळे थंडीत खंड पडणार आहे. देशातील बहुतांश भागा गारठलेला आहे. मात्र बाष्पयुक्त वारे वाहण्यास सुरुवात झाल्याने राज्यात थंडीचा मुक्काम अवघे दोनच दिवस म्हणजे 22 नोव्हेंबरपर्यंत राहील, असा नवा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 23 पासून 25 पर्यंत ढगाळ वातावरण राहील तर 26 पासून राज्यातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पुन्हा किमान तापमानात घटच होऊन थंडी कमी होईल.
नक्की वाचा - आई पंजाबी, भाऊ मुसलमान,वडील ख्रिश्चन आणि बायको हिंदू! कोण आहे स्वतःला सेक्युलर म्हणणारा हा अभिनेता
पुणे, नाशिक गारठले
बुधवारी पुणे व नाशिक शहरात दिवसभर गारठा जाणवत होता. पुणे शहराचे किमान तापमान 12.2 इतके राज्यात सर्वांत कमी तर त्या पाठोपाठ नाशिक 12.4 अंशांवर खाली आले होते.
राज्याचे किमान तापमान
पुणे 12.2, नाशिक 12.4, जळगाव 13.2, महाबळेश्वर 13.2, गोंदिया 13.5, नागपूर 13.6, मालेगाव 14.8, सांगली 15.8, सातारा 14.5, सोलापूर 17.4, धाराशिव 14.8, छ. संभाजीनगर 14, परभणी 13.6, अकोला 15.4, अमरावती 15.3, बुलडाणा 15.2, ब—ह्मपुरी 14.2, चंद्रपूर 14, वर्धा 15, कोल्हापूर 17.2, मुंबई 23.2, रत्नागिरी 22.