Maharashtra Election Result: पश्चिम महाराष्ट्रात भाजप बाहुबली! सातारा, सांगली, सोलापुरात कोण जिंकलं?

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारल्याचे चित्र आहे. साताऱ्यात मंत्री जयकुमार गोरे यांनी आपला बालेकिल्ला राखत म्हसवडमध्ये विरोधकांचा सुपडा साफ केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Satara Sangli Solapur Election Result:  राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचा दबदब पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवत मंत्री जयकुमार यांनी आपली जादू दाखवली आहे. दुसरीकडे सोलापुरात मात्र मोहिते पाटील पॅटर्नने भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. 

साताऱ्यातील  7 नगरपरिषदांवर भाजपचा झेंडा

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारल्याचे चित्र आहे. साताऱ्यात मंत्री जयकुमार गोरे यांनी आपला बालेकिल्ला राखत म्हसवडमध्ये विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. म्हसवड नगरपालिकेत मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली २१ पैकी २१ जागा जिंकत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले. येथे नगराध्यक्षपदी पूजा विरकर यांची निवड झाली आहे. याशिवाय रहिमतपूर, वाई, मेढा आणि मलकापूर येथेही भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

रहिमतपुर नगरपरिषदवर वैशाली माने विजयी झाल्या आहेत.वाई नगर परिषदेत अनिल सावंत विजयी झाले आहेत, मेढा  नगरपंचायतीत रूपाली वाराघडे विजयी झाल्या आहेत तर मलकापुर नगपरिषदेत तेजस सोनवले विजयी झाले आहेत.  सांगली जिल्ह्यात संमिश्र निकाल पाहायला मिळत आहेत. सांगलीच्या ईश्वरपूर तसेच आष्टीमध्ये जयंत पाटील यांनी आपली ताकद दाखवत एकहाती सत्ता मिळवली आहे. 

Nashik NagarParishad Result: नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना सर्वात मोठा पक्ष! महाविकास आघाडीची कामगिरी 'झीरो'

इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम

इस्लामपूर आणि आष्ट्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. मात्र, जत आणि आटपाडीमध्ये भाजपने विजय मिळवत महाविकास आघाडीला रोखण्यात यश मिळवले. विटा आणि शिराळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बाजी मारली आहे. ईश्वरपूर नगरपरिषदेत शरद पवार गटाचे आनंदराव मलगुंडे विजय झाले आहेत. 

Advertisement

 आष्टा नगरपरिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विशाल शिंदे विजयी झीले आहेत.तासगाव नगरपरिषदेत स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया सावंत विजयी झाल्या आहेत. पलूस नगरपरिषदेत काँग्रेसच्या संजीवनी पूदाले विजयी झाले आहेत. विटा नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचे काजल म्हेत्रे विजयी झाले आहेत.  जत नगरपरिषदेत भाजपाचे रवींद्र आरळी विजय झाले आहेत. आटपाडी नगरपंचायतीत भाजपाचे उत्तम जाधव विजयी झाले आहेत.  शिराळा नगरपंचायतीत शिवसेना शिंदे गटाचे पृथ्वीसिंग नाईक विजयी झाले आहेत. 

सोलापुरात कमळ कोमेजलं!

​सोलापूर जिल्ह्यात मात्र भाजपची रणनीती काहीशी फसल्याचे दिसत आहे. जिल्हयातील १२ पैकी केवळ ३ जागांवर भाजपला विजय मिळवता आला. येथे स्वबळावर लढण्याचा निर्णय भाजपच्या अंगलट आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाने ३ जागांवर विजय मिळवला असून, ७ जागांवर महायुती आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, सोलापुरातून काँग्रेस पूर्णपणे हद्दपार झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

Nagpur Election: काटोलमध्ये भाजपचे वर्चस्व मोडीत! अनिल देशमुखांच एक खेळी अन् अर्चना देशमुख नगराध्यक्षपदी