Nashik NaragParishad Result: नाशिक जिल्ह्यातील 11 पैकी 11 नगरपरिषद जागांचा निकाल हाती लागले आहेत. नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 11 पैकी तब्बल 5 जागांवर नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी प्रत्येकी 3 जागांसह दुसऱ्या स्थानाव आहे.
अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांना प्रत्येकी 3 नगराध्यक्षपदाच्या जागांवर विजय मिळवण्यात यश आलं आहे. नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीला एकाही जागेवर आपला नगराध्यक्ष निवडून आणता आलेला नाही.
एकूण आकडेवारी
- नगराध्यक्षपदं – 11
- भाजप - 3
- शिवसेना (शिंदे गट) - 5
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 3
(नक्की वाचा- Amravati Election: चिखलदऱ्यात काँग्रेसचा भाजपला धक्का, शेख अब्दुल शेख हैदर यांची नगराध्यक्ष म्हणून निवड)
नाशिक जिल्हा 11 नगर परिषद निकाल
- भगूर - अजित पवारांची राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे विजयी
- येवला - अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र लोणारी विजयी
- सिन्नर - अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विठ्ठललराजे उगले विजयी
- नांदगाव - शिंदेंच्या शिवसेनेचे सागर हिरे विजयी
- इगतपुरी - शिंदेंच्या शिवसेनेच्या शालिनी खातळे विजयी
- सटाणा - शिंदेंच्या शिवसेनेच्या हर्षदा पाटील विजयी
- त्र्यंबकेश्वर - शिंदेंच्या शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार विजयी
- मनमाड - शिंदेंच्या शिवसेनेचे योगेश पाटील विजयी
- चांदवड - भाजपचे वैभव बागुल विजयी
- पिंपळगाव बसवंत - भाजपचे डॉ. मनोज बर्डे विजयी
- ओझर - भाजपच्या अनिता घेगडमल विजयी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world