जाहिरात

Digital Lounge: मुंबईकरांसाठी Good News! रेल्वे स्थानकात करा ऑफिसचे काम; 'या' स्टेशनवर डिजिटल लाऊंज सुरु

Western Railway Digital Lounge: इतकेच नव्हे तर महत्त्वाच्या चर्चांसाठी खास कॉन्फरन्स आणि मीटिंग रूम्सची व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे.

Digital Lounge: मुंबईकरांसाठी Good News! रेल्वे स्थानकात करा ऑफिसचे काम; 'या' स्टेशनवर डिजिटल लाऊंज सुरु

Digital Lounge At Mumbai Central Station: धावपळीच्या मुंबईत रेल्वे प्रवासादरम्यान कार्यालयीन कामे उरकणे आता अधिक सोपे होणार आहे. पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल स्थानकावर भारतीय रेल्वेतील पहिले 'डिजिटल लाउंज' आणि 'को-वर्किंग स्पेस' कार्यान्वित केले आहे. १७१२ चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले हे लाउंज विमानतळावरील सुविधांच्या धर्तीवर विकसित करण्यात आले असून, यामुळे केवळ प्रवाशांचीच सोय होणार नाही, तर रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.

अनेकदा बिझनेस ट्रॅव्हलर्स किंवा फ्रीलान्सर्सना प्रवासादरम्यान कामासाठी शांत जागा मिळत नाही. हीच गरज ओळखून पश्चिम रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. या लाउंजमध्ये हाय-स्पीड वाय-फाय, चार्जिंग पॉइंट्स, आरामदायी सोफे आणि मॉड्यूलर वर्कस्टेशन्स उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर महत्त्वाच्या चर्चांसाठी खास कॉन्फरन्स आणि मीटिंग रूम्सची व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे.

Accident News: मीरा रोडमध्ये खड्ड्यामुळे तरुणाचा बळी, पोलिसांनी मृत तरुणावरच केला गुन्हा दाखल

डिजिटल लाउंजमध्ये कोणत्या सुविधा मिळणार?

  • हाय-स्पीड वाय-फाय आणि अनेक चार्जिंग पॉइंट्स
  • खुर्च्या, टेबल आणि सोफ्यांसह आरामदायी बसण्याची व्यवस्था
  • खाजगी चर्चांसाठी समर्पित कॉन्फरन्स आणि मीटिंग रूम
  • मीटिंग्ज आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी लवचिक जागा
  • सेल्फ-सर्व्हिस लाईट रिफ्रेशमेंट्स आणि नॉन-अल्कोहोलिक पेये
  • वैयक्तिक उत्पादकतेसाठी मॉड्यूलर वर्कस्टेशन्स
  • अपग्रेड केलेले टॉयलेट आणि वॉशरूम सुविधा

    (नक्की वाचा-  Navi Mumbai: नवी मुंबई पुन्हा हादरली! खारघर आणि कोपरखैरणेतून पुन्हा दोन मुली बेपत्ता; आकडा 458 वर)


रेल्वेलाही होणार मोठा फायदा

या प्रकल्पाद्वारे पश्चिम रेल्वेला पुढील पाच वर्षांत 'नॉन-फेयर रेव्हेन्यू' अंतर्गत ३.२० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. मुंबई विभागाला दरवर्षी सुमारे ५० लाख रुपयांचा महसूल यातून प्राप्त होईल. टेन ११ हॉस्पिटॅलिटीच्या 'INEJ लाउंज'द्वारे याचे व्यावसायिक संचलन केले जाणार आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ रेल्वे प्रवाशांपुरतीच ही सुविधा मर्यादित नाही. ज्यांना घरून काम करताना (Work From Home) अडचणी येतात किंवा ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत जागा हवी आहे, ते देखील ठराविक शुल्क भरून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com