Tukaram Maharaj Beej : जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी बीज सोहळा आज संपन्न होत आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरामधून लाखो भाविक देहूत दाखल झाले आहेत. तर भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पदपथ, रस्त्यांवर व्यवसायास बंदी घालण्याचे पोलीस आयुक्ताचे आदेश असून सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही हजेरी लावणार असल्याची माहिती आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देहूनगरीत आज बीज सोहळा संपन्न होत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूत दाखल झाले आहेत. वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने देहूनगरीत येणाऱ्या भाविक वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरवण्यासाठी नगरपंचायत प्रशासन, शासकीय यंत्रणाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
नक्की वाचा - Shirdi News : शिर्डीतील 'त्या' लोकांवर बहिष्कार टाका! पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे थेट आदेश
तुकाराम बीज काय आहे?
संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. तर त्यांचं वैकुंठ-गमन फाल्गुन वद्य द्वितीयेला झालं असं मानलं जातं. संत तुकाराम महाराजांना देव सदेह वैकुंठात घेऊन गेल्याची मान्यता आहे. या दिवसाला तुकाराम बीज म्हटलं जातं. तुकाराम महाराजांचं वैकुंभगमन देहू (पुणे) येथे इ.स. 1649 मध्ये झाले, असं वारकरी संप्रदाय मानतो. या दिवशी नांदुरकी वृक्ष (देहू येथील एक झाड) दुपारी 12.02 वाजता हलतो, असा भक्तांचा विश्वास आहे. वारकरी संप्रदायासाठी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. यावेळी पंढरपूरहून आणि इतर गावांमधून मोठ्या संख्येने वारकरी देहू येथे येतात. नामस्मरण, कीर्तन, प्रवचन, भजन आणि गाथा पारायणाचे आयोजन होते.
संत तुकाराम महाराज शरीरासह वैकुंठात गेले की नाही याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. काही संत साहित्यिकांच्या मते, संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन किंवा इतर बाबतीत कोणतेही ठोस पुरावे नाहीत.