गौतमी पाटील हीनं आपल्या नृत्यानं संपूर्ण महाराष्ट्राला भूरळ घातली आहे. तिचा कार्यक्रम म्हटला तर मोठ्या प्रमाणत हमखास गर्दी होते. तिचा चाहता वर्गही गेल्या काही वर्षात वाढला आहे. तरूणांमध्ये तिची एक वेगळीच क्रेझ आहे. शिवाय महिला वर्गामध्येही गौतमी लोकप्रिय आहे. तिच्या कार्यक्रमाला महिलाही मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात. गौतमीची लोकप्रियता जसजशी वाढत जात आहे तस तशी तीच्या लग्नाची चर्चाही जोर धरत आहे. गौतमी कोणाशी लग्न करणार ही तिला हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आता गौतमीने दिलं आहे. वर्धा इथं आयोजित कार्यक्रमात तिनं या प्रश्नाला उत्तर देत आपल्या मनात कोणी घर केलं आहे हेच सांगून टाकलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
वर्ध्याच्या आर्वीत प्रिया शिंदे तोडसाम यांनी बहारदार नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला गौतमी पाटीलने हजेरी लावली होती. तिला पाहाण्यासाठी यावेळी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तिने आपल्या नृत्याने सर्वांनाच यावेळी भूरळ घातली. महिला ही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी बोलताना तिने चाहत्यांचे धन्यावाद मानले. शिवाय गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला म्हणजे गोंधळ हे समीकरण झालं आहे. मात्र आता या गोष्टी होणार नाहीत असेही ती यावेळी म्हणाली.
ट्रेंडिंग बातमी - 'राज्यात 2029 मध्ये फक्त भाजपा सरकार', अमित शाहांची घोषणा, 2024 साठी दिला मंत्र
यावेळी गौतमी पाटील हीने एनडीटीव्ही मराठी बरोबर संवाद साधला. आपण लावणी सादर करत नाही. लावणी जर कुणी जिवंत ठेवली असेल तर ती सुरेखा पुणेकर यांनी ठेवली आहे असं ती यावेळी म्हणाली. शिवाय आपण लावणी नाही तर डीजे शो करतो असं तिने सांगितले. त्याच एखादी लावणी सादर करतो. त्यातूनच लोक आपल्याला खूप प्रेम करता. त्यांना आपले नृत्य आवडतं असही ती यावेळी म्हणाले. तिच्या या नृत्यामुळेच तिने अनेकांच्या मनात घर केलं आहे.
मात्र गौतमीच्या मनात आतापर्यंत कुणी घर केलं आहे का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. या प्रश्नावर गौतमी आधी दिलखूलास पणे हसली. उत्तर देताना तिने आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. आपल्या मनात अजूनपर्यंत कुणी घर केलं नाही असे तिने स्पष्ट पणे सांगितले. अजून तरी लग्नाचा विचार नाही असे संकेतही तिने यावेळी दिले. त्यामुळे सतत विचारल्या जाणाऱ्या लग्ना बाबतच्या प्रश्नाला गौतमीने थेट उत्तर देत, या विषयालाच पूर्ण विराम दिला आहे. यापुढेही नृत्यावर आपण लक्ष केंद्रीत करणार असल्याचे तिने स्ष्ट केले.