Guardian Minister : खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच; संजय शिरसाटांनी आधीच केलं जाहीर

खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

अखेर रखडलेलं मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं असून देवेंद्र फडणवीसांनी गृह खातं स्वत: जवळच ठेवलं आहे. एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी जोर लावत असल्याची मोठी चर्चा सुरू होती. मात्र अखेर त्यांना नगरविकासासह गृहनिर्माण आणि रस्ते विकास खात्यावर समाधान मानावं लागलं आहे. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे. 

नक्की वाचा - Cabinet Portfolio: जे खातं वडिलांच्या वाट्याला आलं तेच खातं लेकांना ही मिळालं, 'ते' दोन मंत्री कोण?

दरम्यान शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय खातं मिळालं आहे. मात्र त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान संभाजीनगर पालकमंत्री मीच होणार असल्याचं जाहीर करून टाकलं आहे. अद्याप तरी पालकमंत्रिपदाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तत्पुर्वी संजय शिरसाटांनी आपण छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री होणार असल्याचं सांगितल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. जुलै महिन्यात अब्दुल सत्तार यांना छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रिपद देण्यात आलं होतं. दरम्यान भाजपचे आमदार अतुल सावे देखील येथून पालकमंत्रिपदासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं जातं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिरसाट म्हणाले...
अनेक घटना ज्या संभाजीनगरमध्ये घडल्या आहेत, जी काही गुंडगिरी वाढली आहे, त्यावर आळा घालण्याचं काम मी करणार आहे. कोणत्याही पक्षाचा असला तरीही कारवाई होईल. धाक नाही असं जर कुणी समजत असेल तर त्यांना धडा शिकवला जाईल. संभाजीनगर पालकमंत्री मीच होणार आहे. 

Advertisement