Vidhan Parishad : भाजपकडून विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. विधान परिषदेवर भाजपला तीन जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक आणि शिंदे गटाकडे एक जागा आहे. भाजपनंतर अजित पवार गट आणि शिंदे गट कोणाला संधी देणार याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटातून तीन नावांची चर्चा सुरू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय दौंड, झिशान सिद्दीकी आणि उमेश पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यांच्यापैकी एकाची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काल १६ मार्चला अजित पवार गटाचे एक बैठक बोलावली होती. या बैठकीत विधान परिषदेतील उमेदवारावर चर्चा करण्यात आली.
नक्की वाचा - Vidhan Parishad : मुख्यमंत्र्यांचे मित्र आता दिसणार विधान परिषदेत, जोशींसह आणखी कुणा-कुणाला संधी?
दरम्यान अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण विधान परिषद निवडणुकीत चांगले उमेदवार निवडणे हा त्यांच्या रणनीतीचा भाग आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार अशा नेत्याला संधी देऊ इच्छितात, जो पक्षाची स्थिती मजबूत करू शकेल.
भाजपकडून कोणाला संधी?
विधान परिषदेमध्ये भाजपच्या वाट्याला तीन जागा निश्चित आहेत. उद्या अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे आणि आता ही नाव जाहीर झालेली आहेत. या यादीत संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावाचा समावेश आहे. यंदा विधान परिषदेतील पाच जागा रिक्त झाल्या आहेत. त्यात भाजपला तीन जागा मिळण्याचं निश्चित आहे.