Jalna News: 1 कोटींची लाच मागणाऱ्या महापालिका आयुक्तांचा आका कोण? ED ची चौकशी होणार आका अडकणार?

शिवाय या लाचखोरीत अडकलेल्या आयुक्तांना जालना महापालिकेत कुणी आणलं?

जाहिरात
Read Time: 2 mins
जालना:

लक्ष्मण सोळुंखे 

जालना महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर हे लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले. त्यांनी मागितलेली लाचेची रक्कम पाहाता सर्वांच्याच भूवया  उंचावल्या होत्या. त्यांनी ठेकेदाराकडून तब्बल एक कोटींची लाच मागितली होती. त्यासाठी पहिला हफ्ता म्हणून दहा लाख स्विकारताना त्यांना रंगेहाथ पकडले गेले. त्यांनीनंतर जालना शहरात एकच खळबळ उडली होती. आयुक्तच लाच घेत असतील तर त्या महापालिकेचं काय होणार अशी चर्चा सुरू झाली. पण ऐवढ्या मोठ्या रक्कमेची लाच घेण्याची हिंमत आयुक्तांत आली कुठून? त्यांचा आका कोण? राजकीय वरदहस्त असल्या शिवाय हे डेअरिंग होणार नाही अशी ही चर्चा शहरात सुरू झाली आहे. 

त्यामुळे आयुक्त संतोष खांडेकर यांचा खरा आका कोण आहे असा प्रश्न माजी आमदार कैलाश गोरंट्याल यांनी उपस्थित केला आहे. गोरंट्याल यांनी काँग्रेस सोडून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जालन्यात कैलाश गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्या राजकीय वैर आहे. सध्या हे दोघे ही महायुतीत असले तरी स्थानिक पातळीवर या दोघांमधून विस्तव ही जात नाही. या पार्श्वभूमीवर जालना महापालिकेच्या लाचखोर आयुक्तांची ईडी चौकशी केल्यास त्यांचा 'आका' आपोआप अडकेल असं वक्तव्य कैलास गोरंट्याल यांनी केले आहे. 

नक्की वाचा - Jalna News: महापालिका आयुक्त रंगेहाथ ACB च्या जाळ्यात, लाचेची रक्कम ऐकून घाम फुटेल

लाचखोर आयुक्तांचा 'आका' कोण हे सर्वांना माहित आहे असं ही गोरंट्याल यावेळी म्हणाले. जालन्याचे माजी आमदार आणि भाजप नेते कैलास गोरंटयाल यांनी नाव न घेता आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर हा आरोप केला आहे. आरोपाचं बोट त्यांनी खेट खोतकर यांच्या दिशेने केले आहे. शिवाय या लाचखोरीत अडकलेल्या आयुक्तांना जालना महापालिकेत कुणी आणलं? असा सवाल देखील गोरंटयाल यांनी केला आहे. राजकीय वजन वापरून या आयुक्तांना खोतकर यांनीच जालन्यात आणल्याचंही गोरंट्याल यांचे म्हणणे आहे.  

नक्की वाचा - Raigad News: अनैतिक संबंध, खोटं इंस्टाग्राम अकाऊंट अन् खून! हादरवून टाकणारा तरुण विवाहितेचा खतरनाक प्लॅन

दरम्यान कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. ते आता भाजपवासी झाले आहेत. त्याच वेळी रशीद पलेवान यांनी मात्र काँग्रेसमध्ये प्रवेश करत काँग्रेसला ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी ही आयुक्त संतोष खांडेकर यांच्यावर टीका केली आहे. पण त्याच बरोबर जालन्याचे  माजी आणि आजी आमदार हेच या आयुक्तांचे आका असल्याचा आरोप केला आहे. शिवाय या प्रकरणी ईडीची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवाय तशी चौकशी केल्यास खरा आका समोर येईल. शिवाय तो ईडीच्या जाळ्यातही अडकेल असा दावा ही त्यांनी केला आहे. 
 

Advertisement