इस्रायलला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या देशात का उभारायचाय? काय आहे ऐतिहासिक कनेक्शन?

इस्रायल आपल्या देशातील प्रमुख शहरात महाराजांचा पुतळा उभारणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा इस्रायलमध्ये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
  • या पुतळ्यामुळे भारत आणि इस्रायलमधील धोरणात्मक तसेच सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील
  • इस्रायलमधील यहुदी समाजाचा इतिहास महाराष्ट्राच्या मातीशी जोडला गेला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा आता इस्रायलमध्ये उभारली जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या शिवराज्यभिषेक दिनानिमित्त मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्यदूत यानिव रेवाच यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाचे उर भरून आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे एक स्मारक नसून भारत आणि इस्रायलमधील धोरण आणि संस्कृतीला जोडणारा एक भक्कम दुवा ठरणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ऐतिहासिक उपक्रमाला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

छत्रपतींचा पुतळा उभारण्या मागे शतकांचा इतिहास आहे. इसवी सन पूर्व काळात ग्रीक राजा अँटिओकसच्या अत्याचाराला कंटाळून यहुदी (ज्यु) समाज सुरक्षित आश्रयाच्या शोधात होते. त्यांचा हा शोध भारतात येवून थांबला होता. भारतात आपण सुरक्षित आहोत असं त्यांना वाटलं. त्यानंतर त्यांनी राहण्यासाठी महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची निवड केली होती. त्यावेळी या समूहाला 'बेने इस्रायल' म्हणून ओळखले जात होते. महाराष्ट्रात त्यांनी तेल गाळण्याचा व्यवसाय सुरू केला होता.  त्यांना शनिवारी सुट्टी असायची. त्यामुळे त्यांना स्थानिक लोक 'शनिवारी तेली' म्हणायचे. या समाजाने मराठी संस्कृती इतकी आत्मसात केली की, त्यांची नावे आबाजी, बापूजी, सोनाबाई अशी स्थानिक पद्धतीची झाली होती.

Advertisement

नक्की वाचा - Facebook Down: फेसबुक अन् इंस्टाग्राम अचानक ठप्प का झालं? कारण आलं समोर, लाखो युजर्सना मोठा फटका

छत्रपती शिवाजी महाराजांनी बेने इस्रायली लोकांचे युद्धकौशल्य आणि निष्ठा ओळखली होती. महाराजांनी त्यांच्या शौर्याचे कौतूक केले होते. त्यामुळेच त्यांना आपल्या सैन्यात आणि नौदलात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या लोकांना दिल्या. 17 व्या शतकात आरोन चुर्रिकर मराठा नौदलाचे कमांडर (नायक) होते. टीपूसुलतानविरुद्ध लढणारे सॅम्युअल दिवेकर हे मराठा लाइट इन्फंट्रीत कमांडंर होते. ज्यांच्या नावावरून मुंबईतील प्रसिद्ध 'सॅम्युअल स्ट्रीट'चे नाव ठेवण्यात आले आहे. सॅम्युअल दिवेकर हे ज्यू होते. त्यांच मुळ हे इस्रायल होतं. त्यांनी छत्रपतींचे कमांडर म्हणून काम केले. 

नक्की वाचा - Sachin Tendulkar: सचिन खेळला विमानात क्रिकेट, लेकी- सुनेनं केली बॉलिंग, विकेट कुणी घेतली? पाहा Video

काही बेने इस्रायली हे जंजिराच्या सिद्धी सोबत होते. एका युद्धात जंजिराच्या सिद्दीकडून लढणाऱ्या काही बेने इस्रायली सैनिकांना मराठी सैनिकांनी कैदी केले. त्यांनी आपला जीव दिला पण आपनी निष्ठा बदलली नाही. त्यांच्या या प्रामाणिकतेने प्रभावित होऊन मराठा सरदारांनी त्यांच्या वंशजांना नौदलात उच्च पदे दिली होती हा इतिहास आहे. हाच गौरवशाली इतिहास जगासमोर आणण्यासाठी इस्रायल आपल्या देशातील प्रमुख शहरात महाराजांचा पुतळा उभारणार आहे. ही महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाचा बाब मानायला हवी.