Laxman Hake : लक्ष्मण हाकेंविरोधातील पोस्टनंतर पत्नी संतापल्या, फोनवरुनच शिवीगाळ करीत दिली धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल

लक्ष्मण हाके समाजासाठी नाही, तर स्वतःचं घर भरण्यासाठी काम करतोय, असाही आरोप धायगुडे यांच्याकडून करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांच्याविरोधात त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या हनुमंत धायगुडे याच्याकडून धक्कादायक आरोप केले जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हनुमंत धायगुडे नावाची व्यक्ती सोशल मीडियावरुन लक्ष्मण हाके यांच्यावर दलाली आणि विधानसभेत उमेदवारांकडून पैसे उकळल्याचे गंभीर आरोप करीत आहेत. लक्ष्मण हाके समाजासाठी नाही, तर स्वतःचं घर भरण्यासाठी काम करतोय, असाही आरोप धायगुडे यांच्याकडून करण्यात आला आहे.

लक्ष्मण हाके यांच्या पत्नी विजया हाके यांनी हनुमंत धायगुडे यांच्या पत्नी दिव्या धायगुडे यांना फोन करून शिव्याशाप दिल्याचं समोर आलं आहे. हनुमंत धायगुडे यांनी लक्ष्मण हाकेंविरोधात सोशल मीडिया पोस्ट केल्यानंतर संतापलेल्या विजया हाके यांनी फोन करून अत्यंत वाईट शब्दात संभाषण केल्याचं समोर आलं आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्या पत्नीने हनुमंत धायगुडे यांच्या पत्नीला फोन करून शिव्या घालत धमकी दिल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात एक ऑडिओ कॉल व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी हनुमंत धायगुडे यांनी लक्ष्मण हाके विरोधात फेसबुकवर पोस्ट करत टीका केली होती. लक्ष्मण हाके हा राखी सावंत आहे, पैसे आणि टीआरपीसाठी काही करायला तयार असतो अशी पोस्ट हनुमंत धायगुडे यांनी केली होती. 

नक्की वाचा - Akola News : ती कारवाई अन् तलाठी संतापला, नायब तहसीलदाराला जातीवाचक शिवीगाळ; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

लक्ष्मण हाके यांच्या पत्नीने हनुमान धायगुडे यांच्या पत्नीला फोन लावून शिवीगाळ करत धमकी दिली आहे, याचा एक ऑडिओ कॉलही समोर आला आहे. 

Advertisement

लक्ष्मण हाकेंचा अजित पवार गटावर आरोप...
या प्रकरणात लक्ष्मण हाके यांनी अमोल मिटकरी यांच्यावर आरोप केले आहेत. धायगुडे यांना भडकवण्यात आलं असून माझ्याविरोधात भडकवण्याचा कट केला जात असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.