अमोल सराफ, प्रतिनिधी
Wild Bear Viral Video : अजिंठा पर्वत रांगेत वसलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये पशु-पक्षांसाठी पोषक वातावरण आहे. प्राण्यांसाठी मोठी अन्नसाखळीही इथे निर्माण करण्यात आली आहे. या जंगलात अस्वल, बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्यांचा वावरही आहे. वनविभागाचे कर्मचारी ज्ञानगंगा अभयारण्यात गस्तीवर असताना एका अस्वलाचं सुंदर रूप पाहायला मिळालं. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत या अस्वलाने भन्नाट डान्सही केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे अभयारण्य पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे..तर वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि ज्ञानगंगा अभयारण्याची समृद्ध जैवविविधता वन विभागाकडून जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांनीही येथील निसर्ग सुरक्षित ठेवण्याचं आवाहन वन विभागाने केलं आहे.
या भागात बिबट्याही करतात मुक्त संचार
बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हे मुख्यतः अस्वल आणि बिबट्यांच्या मुक्त संचारासाठीओळखले जाते. वाढत्या वन्य जीवांमुळे रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत बुलढाणा हा मार्ग प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने बंद देखील केला आहे. अनेक वेळा येथील गावाजवळ बिबट्या आणि अस्वलांचा वावर होत असल्याचं पाहायला मिळतं.
नक्की वाचा >> Pune News: मोशी दुर्घटना, 40 तास उलटले, 'त्या' लोकांचा श्वास अजूनही कोंडलेलाच, रेस्क्यू टीमने आखलाय मोठा प्लॅन
205 चौरस किमीपर्यंत पसरलंय हे अभयारण्य
खामगाव ते बोथा मार्गे बुलढाण्यात जात असताना अनेक छोटी मोठी गावं लागतात. खबरदारीचा उपाय म्हणून सतत इथे सुरक्षा देखील तैनात करण्यात आली आहे. अशातच पावसाळ्याच्या दिवसात अस्वल, बिबट, मोर हे सहजपणे या जंगलात वावरतात. हे अभयारण्य जवळपास 205 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे.
Buldhana | Dnyanganga Sanctuary Bear Video | अस्वलांनी केली पावसात एकच धम्माल, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल | NDTV मराठी
— NDTV Marathi (@NDTVMarathi) July 10, 2026
अजिंठा पर्वत रांगेत वसलेल्या बुलडाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये अनेक जाती प्रजातीचे पक्षी प्राणी आहेत. सध्या पाऊस होत आहेत. त्यामुळे या अभयारण्यातील वातावरण… pic.twitter.com/QcqgHgO5w0
नक्की वाचा >> Pandharpur News : वारकऱ्यांसाठी अलर्ट! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात महिला चोरांची टोळी सक्रिय, CCTV Video
तब्बल चार वर्षांनंतर, जानेवारी 2026 मध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पातून (PKT7CP-1) नावाचा तीन वर्षीय नर वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात आणण्यात आला आहे. पर्यटकांमध्ये त्याला 'धुरंधर' म्हणून ओळखले जाते. येथे 150 हून अधिक विविध प्रजातींचे पक्षी वास्तव्यास आहेत. उन्हाळ्यात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्यांवर मचाण बांधून वनविभागाकडून वन्यप्राणी गणना केली जाते, ज्यामध्ये दरवर्षी प्राण्यांच्या संख्येत सकारात्मक वाढ दिसून येत आहे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world