गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, नागरिकांमध्ये दहशत

सध्या गडचिरोली जिल्ह्यात 50 पेक्षा जास्त वाघांची संख्या असून वाघांच्या दहशतीमध्ये जिल्ह्यातील शेतकरी, मजूर आपला जीव मुठीत धरून वनमजुरी करत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

नरेश सहारे, गडचिरोली

गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवाली सकाळी तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केला. गडचिरोली मुख्यालयापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबेशिवणीजवळील बामणी बीट क्रमांक 411 मध्ये ही घटना घडली आहे. पार्वता बालाजी पाल असं 64 वर्षीय महिलेचं नाव आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गडचिरोली जिल्ह्यात मागील एक आठवड्यापासून तेंडूपत्ता गोळा करण्याचे काम सुरू आहे. तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी मजूर पहाटे 5 वाजेपासून जंगलात असतात. आज सकाळी बामणी बीट क्रमांक 411 या जंगलात तेंदूपत्ते गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. यामध्ये ही महिला जागीच ठार झाली.  वन विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. मृतकाच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये आर्थिक मदत देणार असल्याची माहिती गडचिरोली वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी दिली. 

(नक्की वाचा- अवघा 20 वर्षांचा, दीड वर्षांपूर्वी लग्न, 4 महिन्याचं लेकरू; सचिनबरोबर भयंकर घडलं)

सध्या गडचिरोली जिल्ह्यात 50 पेक्षा जास्त वाघांची संख्या असून वाघांच्या दहशतीमध्ये जिल्ह्यातील शेतकरी, मजूर आपला जीव मुठीत धरून वनमजुरी करत आहेत. तेंदूपत्ता हंगामात वाघाच्या हल्ल्याची ही पहिली घटना असली तरी रानटी हत्तींनी सुद्धा जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे.

(नक्की वाचा - रिक्षाचा चुराडा, मोबाइल सापडला, पण 12 तासानंतरही 'तो' बेपत्ता)

गडचिरोली वन विभागात येत असलेल्या आंबेशिवणी बामणी जंगलात वाघाने मागील अनेक वर्षापासून धुमाकूळ घातलेला आहे. यापूर्वी सुद्धा वाघाने अनेक नागरिकांवर हल्ला करुन जीव घेतला आहे. त्यामुळे या नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Advertisement
Topics mentioned in this article