जाहिरात

अवघा 20 वर्षांचा, दीड वर्षांपूर्वी लग्न, 4 महिन्याचं लेकरू; सचिनबरोबर भयंकर घडलं

कोणाला काही कळायच्या आत, अवघ्या काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं.

अवघा 20 वर्षांचा, दीड वर्षांपूर्वी लग्न, 4 महिन्याचं लेकरू; सचिनबरोबर भयंकर घडलं

13 मेची संध्याकाळ मुंबईकरांसाठी एक मोठा धक्का होता. उन्हाच्या तीव्र झळ्यांपासून सावरत असताना सायंकाळी पावसाने काही काळ दिलासा दिला असला तरी या घोंगावत्या वाऱ्याने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. सायंकाळी धुळीचे लोट पसरत होते, सोसाट्याचा वारा वाहत होता आणि पावसाच्या सरी बरसू लागल्या. अचानक आलेल्या पावसामुळे लोक सैरावैरा पळू लागले. काहीजण कामावरुन लवकर निघाले, काहींनी ओला-उबेरने जाण्याचा निर्णय घेतला. पुढे अडकावं लागू नये म्हणून लोक पेट्रोल भरून घेत होते.

अशातच घाटकोपरच्या छेडा नगर परिसरातील एक होर्डिंग्स सोसाट्याच्या वाऱ्याने लगतच्या पेट्रोल पंपावर कोसळलं. कोणाला काही कळायच्या आत, अवघ्या काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. तब्बल 250 टन वजनाचं होर्डिंग कोसळल्याने पेट्रोल पंपावरील 100 हून अधिक लोक दबले गेले होते. लोकांच्या ओरडण्याचा आवाज येत होता.. गाडीत बसलेले तर आतच चिरडले गेले होते. यानंतर तातडीने आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले. मात्र इतक्या वजनाचं होर्डिंग्स हलवणं कोणालाच शक्य होत नव्हत. 

नक्की वाचा - रिक्षाचा चुराडा, मोबाइल सापडला, पण 12 तासानंतरही 'तो' बेपत्ता

या होर्डिंगखाली सचिन यादवही चिरडला गेला होता. 20 वर्षांचा सचिन गेल्या दोन वर्षांपूर्वी घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर कामवर रुजू झाला होता. सायन येथे राहणाऱ्या सचिनचं दीड वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं. त्यात लग्नानंतर वर्षात पाळणा हलल्याने कुटुंबात आनंदी वातावरण होतं. सचिन घरात एकटाच कमावता होता. त्याचे दोन लहान भाऊ आणि वडील उत्तर प्रदेशातील गावी राहत होते. सोमवारी मुंबईत सोसाट्याचा वारा सुरू असल्याने सचिन घरी कधी परतणार याची कुटुंबीय वाट पाहत होते. मात्र सचिन कधीच परतू शकणार नाही. ज्यावेळी होर्डिंग कोसळली त्यावेळी सचिन तिथंच उभा होता. आपलं काम करीत असताना होर्डिंग कोसळले आणि जागीच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने नागपुरला जाणं होणार सोपं; रेल्वेकडून आनंदाची बातमी
अवघा 20 वर्षांचा, दीड वर्षांपूर्वी लग्न, 4 महिन्याचं लेकरू; सचिनबरोबर भयंकर घडलं
supreme-court-stays-ngt-order-dhol-tasha-troupes-ganpati-visarjan-pune
Next Article
पुणेकरांनो, वाजवा रे वाजवा..गणेशभक्तांसाठी सुप्रीम कोर्टानं रद्द केला बंदीचा 'तो' आदेश