जाहिरात

Yavatmal News: महिन्यापूर्वी प्रेमविवाह, पती-पत्नी घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत, भयंकर दृश्य पाहून गाव हादरलं

रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला असता विहिरीजवळ त्यांची दुचाकी आढळून आली. त्यानंतर विहिरीत शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह आढळले. 

Yavatmal News: महिन्यापूर्वी प्रेमविवाह, पती-पत्नी घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत, भयंकर दृश्य पाहून गाव हादरलं

प्रतिक राठोड, यवतमाळ

Yavatmal Couple Death:  महिनाभरापूर्वी प्रेमविवाह, सुखी संसाराची स्वप्न... मात्र एका निर्णयाने संसार फुलण्याआधी कायमचा संपला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये घडलेल्या एका काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यवतमाळच्या मारेगाव तालुक्यात नवविवाहित दांपत्याने विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Beed Crime : फोन करून सांगितलं'कार्यक्रम ओके'! प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवलं

नवविवाहित दांपत्याची आत्महत्या 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सग्नापूर येथील नवविवाहित दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आशिष धानोरकर आणि करिश्मा धानोरकर अशी मृतांची नावे आहेत.अवघ्या महिनाभरापूर्वी म्हणजे ४ मे रोजी या दोघांचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला होता. 

मात्र सोमवारी रात्री दोघेही दुचाकीने घराबाहेर पडले आणि गावालगतच्या शेतातील विहिरीत उडी घेत जीवन संपवले. विशेष म्हणजे मृत्यू निश्चित व्हावा म्हणून दोघांनीही आपल्या पोटाला दगड बांधल्याची माहिती समोर आली आहे.रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला असता विहिरीजवळ त्यांची दुचाकी आढळून आली. त्यानंतर विहिरीत शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह आढळले. 

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.नुकतेच लग्न झालेल्या या दाम्पत्याने इतका टोकाचा निर्णय का घेतला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मारेगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

(नक्की वाचा-  मित्राचा जेवणाचा डब्बा पाहून विद्यार्थ्यांची शिक्षकांकडे धाव, पालकांच्या तक्रारीनंतर विद्यार्थ्याच्या आईला अटक)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com