सर्वात तरुण आमदार, रोहित पाटील! पहिल्या प्रतिक्रियेने हृदय जिंकलं; म्हणाले...

माजी खासदार संजयकाका पाटील यांचा पराभव करत रोहित पाटलांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर आता रोहित पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

शरद सातपुते, सांगली: राज्यातील सर्वात तरुण आमदार म्हणून माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांची सुपुत्र रोहित आर आर पाटील हे निवडून आले आहेत. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार माजी खासदार संजयकाका पाटील यांचा पराभव करत रोहित पाटलांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर आता रोहित पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

आमदार झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांच्या अभिनंदन करण्यासाठी अंजनी या त्यांच्या गावात लोकांनी मोठी गर्दी केली होती.  सकाळी आबा कुटुंबीयांकडून रोहित पाटलांचा औक्षण देखील करण्यात आलं आणि यानंतर रोहित पाटलांनी आपल्या आमदार म्हणून पहिल्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात देखील केली. यावेळी बोलताना त्यांनी मी आमदार झालो,हे मला अजूनही पटत नाही,  आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला अजूनही पटत नाही, मी आमदार झालोय, पण माझ्या कष्टाचं फळ असून लोकांनी मला आमदार केलं, असे मत देखील रोहित आर आर पाटलांनी व्यक्त केला आहे.

नक्की वाचा: मनोज जरांगे फॅक्टर का ठरला फ्लॉप? महायुतीची खेळी पडली भारी; वाचा 5 महत्वाचे मुद्दे 

रोहित पाटील हे राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर पाटील यांचे सुपुत्र आहेत. आर आर पाटील यांच्या निधनानंतर रोहित पाटील राजकारणात सक्रिय झाले. वयाच्या 25 वर्षी त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेचे तिकीट मिळवले होते. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीकडून अजित पवार गटाचे संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. थेट अजित पवार यांनी आव्हान दिल्याने ही निवडणूक रोहित पाटील यांच्यासाठी महत्वाची ठरली होती.

दरम्यान, रोहित पाटील यांचा या निवडणूकीत जवळपास 27 हजारांच्या लीडने दणदणीत विजय झाला. या विजयाबद्दल रोहित पाटील यांचे राज्यभरातून कौतुक होत असून वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी आमदार होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. 

Advertisement

महत्वाची बातमी: महायुतीचा पुढचा प्लॅन काय? केसरकरांनी आतली बातमी सांगितली