जाहिरात

महायुतीचा पुढचा प्लॅन काय? केसरकरांनी आतली बातमी सांगितली

हा विजय अद्वितीय आहे अशी प्रतिक्रीया दिपक केसरकर यांनी दिली आहे. लोकांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे येवढे मोठे यश महायुतीला मिळाले असे ही ते म्हणाले.

महायुतीचा पुढचा प्लॅन काय? केसरकरांनी आतली बातमी सांगितली
मुंबई:

विधानसभा निवडणुकीत महायुतील जबरदस्त यश मिळाल्यानंतर आता शपथविधीची तयारी केली जात आहे. त्या आधी मुख्यमंत्री कोण याचा निर्णय दिल्लीत होणार आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बरोबर फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री कोणा याचा निर्णय घेतला जाईल. त्यानंतर उद्या म्हणजे सोमवारी शपथविधी होणार आहे. हा शपथविधी राजभवनवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील, अशी माहिती समोर येत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शपथविधी बाबत रात्री उशिरा दिल्लीत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यासाठी फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे दिल्लीला रवाना होत आहे. उद्या शपथविधी होणार हे निश्चित आहे. तुर्तात तिघांचा शपथविधी होणार आहे. अन्य कोणालाही मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार नाही. नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची दाट शक्यता आहे, अशी सुत्रांकडून माहिती मिळत आहे. त्या कालावधी कोणाला किती मंत्रीपद मिळणार हे निश्चित केले जाणार आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याने त्यांचा सत्तेला वाटा हा पन्नास टक्के असणार आहे. त्यामुळे शिंदे आणि अजित पवारांच्या वाट्याला कमी मंत्रीपदं येण्याची दाट शक्यता आहे. 

ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसला अति आत्मविश्वास नडला, चंद्रपूरात मोठा उलटफेर कसा झाला?

महायुती सरकारला 25 तारखेला शपथ घ्यावी लागणार आहे. 26 तारखेला मुदत संपत आहे. मुख्यमंत्रिपदा बाबतचा निर्णय हा दिल्लीत होणार आहे असंही केसरकर यांनी यावेळी सांगितलं. फडणवीस आणि शिंदे ही जोडी आहे. या जोडीने चमत्कार करून दाखवला आहे. वानखेडेवर शपथ विधी होण्याची शक्यता आहे असेही केसरकर म्हणाले. पण कुठे होणार हे अजूनही निश्चित नाही. शिवाजी पार्क मैदानावर शपथविधी सोहळा व्हावा असंही ठरवलं होतं. पण तांत्रिक अडचणी असल्यामुळे तिथे होऊ शकत नाही असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - पाडा पाडा पाडा! असं पवारांनी ज्या मतदार संघात सांगितलं, तिथं काय झालं?

दरम्यान हा विजय अद्वितीय आहे अशी प्रतिक्रीया दिपक  केसरकर यांनी दिली आहे. लोकांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे येवढे मोठे यश महायुतीला मिळाले असे ही ते म्हणाले. निवडणूक झाली की नेहमीच ईव्हीएमला दोष दिला जातो. पण महायुतीचा भगवा फडकला आहे हे सत्य आहे. जे लोक आमच्यावर टीका करत होते. वाईट बोलत होते त्यांना जनतेने सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले त्याची शिक्षा त्यांना मिळाली असेही केसरकर यावेळी म्हणाले. संजय राऊत हे रस्त्यावर जसे काही जण पोपट घेऊन भविष्य वाणी करतात तसे आहेत अशी टीका ही त्यांनी केली. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com