मविआत मोठा भाऊ कोण? पृथ्वीराज चव्हाण पहिल्यांदाच थेट बोलले

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडी बाबत मोठे वक्तव्य केले आहे. मविआमध्ये मोठा भाऊ कोण? या प्रश्नाचा थेट निकालच त्यांनी लावला आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
जळगाव:

विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण? युती आघाडीत मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण? याची चर्चाही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडी बाबत मोठे वक्तव्य केले आहे. मविआमध्ये मोठा भाऊ कोण? या प्रश्नाचा थेट निकालच त्यांनी लावला आहे. विशेष म्हणजे याबाबत ते पहिल्यादाच माध्यमां बरोबर बोलले आहेत. चव्हाण यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर मविआचे घटक पक्ष त्याबाबत काय बोलतात याकडे मात्र लक्ष लागले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मविआत मोठा भाऊ कोण? 

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनी महाविकास आघाडीत मोठा भाऊ हा काँग्रेसच असेल असे वक्तव्य केले होते. शिवाय मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच होईल अशा ही प्रतिक्रीया काँग्रेसच्या गोटातून आल्या होत्या. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना थेट विचारण्यात आले. महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? यावर बोलताना चव्हाण म्हणाले आमच्यात भांडणं लावण्याच प्रयत्न केला जातोय. पण आम्ही तिनही पक्षा एकत्रीत आहोत. शिवाय छोटे पक्ष आणि सामाजिक संघटना ही आमच्या सोबत असतील. त्यामुळे मोठा भाऊ आणि छोटा भाऊ कोण हा प्रश्नच शिल्लक राहत नाही. एकसंध पणे निवडणूक लढणे आणि ती निवडणूक जिंकणे हेच आमचे धेय असल्याचे चव्हाण म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - वरळीत हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाचा नेता पोलिसांच्या ताब्यात, तर मुलासह दोघांना अटक

'सरकारला घालवायचे आहे' 

हे सरकार भ्रष्टाचारी आहे. हे सरकार घालवायचे आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. जो उमेदवार सक्षम असेल त्यालाचा उमेदवारी दिली जाईल. त्यावरून मविआमध्ये मतभेद नसतील असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत आपला चांगला विजय झाला असला तरी त्या विजयाने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हुळहळून जाऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला. लोकसभा आणि विधानसभा वेगवेगळ्या असतात. पुर्ण ताकदीने मविआ निवडणुकीला सामोरे जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातली जनता मविआच्या मागे खंबिर पणे आहे असेही ते यावेळी म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश

जागा वाटपाबाबत चर्चा होईल 

मविआची जागा वाटपाबाबत अजूनही चर्चा झालेली नाही असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. लवकरच जागा वाटपाची चर्चा सुरू होईल. छोट्या पक्षांनाही जागा सोडल्या जातील असेही ते म्हणाले. काँग्रेसला आपली ताकद वाढवायची आहे. शिवाय ज्या ठिकाणी मित्र पक्षाचा उमेदवार असेल त्या ठिकाणी काँग्रेस त्यांना ताकद देईल असेही त्या वेळी म्हणाले.आम्हाला महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे आहेत. जागा वाटपाची नक्कीच चर्चा होईल.मात्र लोकसभेत ज्या पद्धतीने आम्ही एकत्र लढलो त्याच पद्धतीने आम्ही विधानसभा ताकतीने लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.   
 

Advertisement