जाहिरात

Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांना आता आपल्याच पक्षाच्या मंत्र्याने सुनावले खडे बोल

आपल्याच पक्षाच्या महिला मंत्र्याने चाकणकर यांना झापल्याची चर्चा या बैठकीनंतर विधान भवनात रंगली होती.

Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांना आता आपल्याच पक्षाच्या मंत्र्याने सुनावले खडे बोल
मुंबई:

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होत आहेत. त्यात वैष्णवी हगवणे सारखं प्रकरण ही समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर विधान भवनात विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी बैठकीत आयोजन केलं होतं. या बैठकीला महिला आयोगासह सर्व महिला लोकप्रतिनिधींना ही निमंत्रीत करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी रुपाली चाकणकर यांना खडे बोल सुनावले असल्याचं समजतयं. आपल्याच पक्षाच्या महिला मंत्र्याने चाकणकर यांना झापल्याची चर्चा या बैठकीनंतर विधान भवनात रंगली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वैष्णवी हगवणे प्रकरण, चाणकरांना दिलेली सुरक्षा, चाकणकरांनी अलीकडच्या काळात विरोधकांबाबत केलेली वक्तव्य यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर या चांगल्याच अडचणीत आल्या आहे. विधान भवात झालेल्या बैठकीत जरी महिला सुरक्षेबाबत चर्चा झाली. पण या बैठकीत चाकणकरांनी काही मुद्दे मांडले. सध्या होत असलेल्या घटनांमुळे आपल्याला आणि आयोगाला सोशल मिडीयाच्या माध्यमातून  ट्रोल केलं जात आहे. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

ट्रेंडिंग बातमी - 'रुपाली चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का?',अंधारे-चाकणकर यांच्यात जुंपली, एकमेकींना थेट...

यावर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी चाकणकर यांच्या फटकारले आहे. सोशल मीडियावर ट्रोल कोण करते हे सांगण्यापेक्षा, महिला आयोग पुढे काय काम करणार आहे हे सांगा, अशा शब्दात त्यांनी चाकणकर यांना बैठकीत सुनावल्याची सूत्रांची माहिती आहे. चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे. शिवाय त्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ही प्रदेशाध्यक्ष आहेत. अशा स्थितीत ही आपल्याच पक्षाच्या चाकणकरांना फटकारताना आदिती तटकरे यांनी कोणताही मुलाहीजा ठेवला नाही. 

ट्रेंडिंग बातमी - Shivsena Vs Ajit pawar: शिवसेनेचे मंत्री अजित पवारांविरोधात नाराज? एकनाथ शिंदें बरोबरच्या बैठकीत काय झालं?

 आदिती यांच्या प्रमाणे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ही चाकणकर यांचा समाचार घेतला. रुपाली चाकणकर या कोण आहे. त्या रश्मिका मंदाना आहेत का? का त्या स्मृती इराणी आहेत? असा खोचक सवाल त्यांनी केला होता. जेणे करून त्यांच्यावर टीका केली तर आम्हाला प्रसिद्धी मिळेल, अशी विचारणा ही त्यांनी केली. शिवाय त्या कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रिमो आहेत. त्या बॉलिवूडच्या सुप्रिमो आहेत की  राजकारणातल्या सुप्रिमो आहेत. जेणे करून त्यांच्यावर आम्ही बोलावे आणि नंतर आम्हाला प्रसिद्धी मिळावी असं ही त्या म्हणाल्या. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com