बदलापुरातील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात कठोर कारवाईच्या मागणीसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर बदलापूरमध्ये आल्या होत्या. मात्र इथून उल्हासनगरला जात त्यांनी हातावर मेंदी काढून घेतली. त्यामुळे चाकणकर या खरोखर बदलापूरमधील घटनेबाबत संवेदनशील आणि गंभीर आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवाय त्यांच्या याकृतीमुळे त्यांच्यावर टिकेचीही झोड उठली आहे. चाकणकर यांच्या संवेदना मेल्या आहेत का असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बदलापुरात एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर त्याचे पडसाड संपुर्ण राज्यात उमटले. विरोधीपक्ष रस्त्यावर उतरला. बदलापूरात तर नागरिकांनीच आंदोलन होती घेतलं. लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला. बदलापुरात रेल रोको झाला. दगडफेक तोडफोडीच्या घटनाही झाल्या. गावागावात निषेध मोर्चे निघाले. महाविकास आघाडीने तर बंदचीही हाक दिली. याच वेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी बदलापुरला भेट दिली.
ट्रेंडिंग बातमी - बंद मागे निषेध सुरू, ठाकरे, पवार, पटोले रस्त्यावर उतरणार
बुधवारी त्यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात येऊन या घटने संदर्भात माहिती घेतली. मात्र इथून निघाल्यानंतर लगेच चाकणकर या उल्हासनगर मधील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात गेल्या. तिथे आपल्या हातावर मेहंदी काढण्यामध्ये त्या रमल्या होत्या. उल्हासनगरच्या गोल मैदान परिसरातील रॉयल बँक्वेट हॉलमध्ये सिंधी समाजाच्या तीज सणानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.चाकणकर यांचा मेहंदी काढण्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
हा व्हीडिओ समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. रूपाली चाकणकर या नौटंकीबाज असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी केली आहे. एकीकडे बदलापुरातील लोकांनी उस्फुर्द पणे येणारा सण साजरा करणार नसल्याचे सांगितले आहे. दहीहांडीचे कार्यक्रमही रद्द केले आहेत. बँडवाल्यांनी कोणतही सुपारी घेणार नसल्याचेही जाहीर करत आपली संवेदना दाखवली आहे. अशा वेळी रुपाली चाकणकर यांनी हातावर मेहंदी काढून घेणे किती संवेदनशिल आहे अशी विचारणा होत आहे.