मुलगा जय विधानसभा निवडणूक लढवणार का? अजित पवारांनी दिलं उत्तर

विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागतात राज्यातील नेत्यांची कोणती मुलं रिंगणात उतरणार याची चर्चा सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (DY CM Ajit Pawar) यांचा मुलगा जय पवार (Jay Pawar) यांची सध्या जोरदार चर्चा आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
A
मंचर:

अविनाश पवार, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागतात राज्यातील नेत्यांची कोणती मुलं रिंगणात उतरणार याची चर्चा सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (DY CM Ajit Pawar) यांचा मुलगा जय पवार (Jay Pawar) यांची सध्या जोरदार चर्चा आहे. जय पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असं सध्या बोललं जातंय. अजित पवारांच्या एका वक्तव्यानं या चर्चेला उधाण आलंय. 

अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड मतदारसंघातही जय यांनी बैठका सुरु केल्या आहेत. त्यामुळे जय इथून विधानसभा लढणार का? याचीही उत्सुकता आहे. जय पवार यांचे चुलत भाऊ रोहित पवार सध्या या मतदारसंघाचे आमदार आहेत. जय कर्जत-जामखेडमधून उतरल्यास इथं पवार विरुद्ध पवार ही हायव्होल्टेज लढत पाहायला मिळू शकते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अजित पवार काय म्हणाले?

जय पवारांच्या संभाव्य उमेदवारीवर चर्चा सुरु असतानाच अजित पवार यांनी या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एखाद्या मुलाला करिअर करायचं असेल त्यासाठी मी विरोध करायचं किंवा वाईट वाटायचं कारण नाही. पण, जय पवार निवडणूक लढणार का हे सांगायला मी ज्योतिषी नाही,' असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. मुलाच्या निवडणूक लढवण्याचा प्रश्नावर अजित पवारांनी पहिल्यांदाच ही प्रतिक्रिया दिली आहे.

( नक्की वाचा : अजित पवारांना आता पश्चाताप का होतोय? विधानसभेपूर्वी काकांशी करणार पॅचअप? )

सुप्रिया सुळेंकडून राखी बांधणार?

सोमवारी (19 ऑगस्ट ) रोजी राखी पौर्णिमेचा सण आहे. त्या दिवशी अजित पवार सुप्रिया सुळेंकडून राखी बांधणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. 'मी उद्या मुंबईत असून  ज्या बहिणी मुंबईत असतील त्यांच्याकडून राखी बांधुन घेणार आहे,' असं अजित पवार यांनी सांगितलं. सुप्रिया सुळे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. तर अजित पवार हे सोमवारी मुंबईत असतील. 

Advertisement

( नक्की वाचा : 'भावानं मागितलं असतं तर सर्व काही देऊन टाकलं असतं,' काय पक्ष आणि चिन्ह...)
 

अजित पवारांची बारामतीमधून माघार?

बारामती विधानसभा मतदार संघ अजित पवारांचा गड मानला जातो. 1991 पासून अजित पवार सतत या मतदार संघातून निवडून आले आहेत. यावेळची विधानसभा निवडणुकही ते बारामतीतून लढतील हे मानले जात होते. पण त्यांच्या एका वक्तव्याने आता ट्वीस्ट निर्माण झाला आहे. बारामतीतून आपण सात ते आठ वेळा निवडणूक लढली आहे आणि जिंकलीही आहे. त्यामुळे यावेळी निडणूक लढण्यास आपण इंटरेस्टेट नाही. असं असलं तरी याबाबतचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेईल. कोणाला उमेदवारी द्यायचे तेही तेच ठरवतील असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. त्यामुळे अजित पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Topics mentioned in this article