Ajit Pawar Banners Video Viral : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. बारामती विमानतळावर लँडिंग करताना विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि विमान जमिनीवर आदळलं. त्यानंतर विमानाचा भीषण स्फोट झाला आणि अजित पवार यांच्यासह चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यानंतर अजितदादांच्या मृत्यूबाबत अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांचा घातपात झाल्याचा तीव्र संशय व्यक्त केला आहे. विमान अपघाताबाबत अनेक धक्कादायक खुलासे करत मिटकरींनी या प्रकरणाला वेगळचं वळण लावलं आहे. अशातच अजित पवार 9 तारखेला कमबॅक करणार असल्याच्या चर्चा इंटरनेटवर रंगल्या आहेत.
राष्ट्रवादीचे नेते प्रचंड भावुक, ते व्हिडीओ होतायत व्हायरल
दुसरीकडे, अजितदाद जिवंत असल्याच्या पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. '9 तारखेला अजितदाद परत येणार आहेत','कामाचा माणूस परत येतोय','9 तारखेला अजितदाद कमबॅक करणार',अशा आशयाचे पोस्टर झळकले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांप्रती असलेलं अतुट प्रेम बॅनर्सच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. उद्या 9 फेब्रुवारीला राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांचा निकाल जाहीर होणार आहे. अशातच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या कमबॅकचे बॅनर्स लावून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अनेक कार्यकर्त्यांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल्याचे बॅनर्स लावले आहेत. अशातच इंटरनेटवर वेगळीच चर्चा रंगलीय. 'लवकरच बॅनर काढायला तयार राहा', अशा कॅप्शनचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
नक्की वाचा >> Ajit Pawar Death : 'पायलटने Mayday कॉल दिला नाही,त्याला टेकऑफ नंतर..', विमान अपघाताचा नवा ट्वीस्ट समोर
अजित पवार यांच्या पवित्र अस्थींचे विधिवत विसर्जन
दरम्यान,आज उत्तरप्रदेशातील पावन प्रयागराज येथे गंगा–यमुना–सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पवित्र अस्थींचे परंपरेनुसार विधिवत विसर्जन करण्यात आले.
नक्की वाचा >> Mumbai Video : घाटकोपरनंतर मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर संतापजनक घटना, तरुणाला रंगेहाथ पकडलं
पवार कुटुंबियांनी या पवित्र भूमीत आत्मिक शांती,श्रद्धा व मोक्षाची अनुभूती घेतली. या दु:खद प्रसंगी दिवंगत अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार हे कुटुंबीयांसह प्रयागराज येथे उपस्थित होते.
पुरोहितांच्या सान्निध्यात अस्थि-कलशाचे पूजन करण्यात आल्यानंतर संगमाच्या व्हीआयपी घाटावर श्रद्धेने पवित्र अस्थी संगमात प्रवाहित करण्यात आल्या.