जाहिरात

Ajit pawar: 'हा रुसला, तो फुगला, समजूत काढा, त्याची आता गरज लागणार नाही' भुजबळांना थेट टोला

अजित पवारांनी छगन भुजबळांचा दबाव आता धुडकावून लावला आहे. त्यांनी आत थेट भूमिका घेतली आहे.

Ajit pawar: 'हा रुसला, तो फुगला, समजूत काढा, त्याची आता गरज लागणार नाही' भुजबळांना थेट टोला
पुणे:

मंत्रिमंडळात न घेतल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांची नाराजी अजूनही कमी झाली नाही. त्यामुळे त्यांनी आता ओबीसींची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हे दबावाचे राजकारण असल्याचे त्यांची राजकीय वर्तूळात चर्चा आहे. मात्र भुजबळांच्या या दबावाच्या राजकारणाकडे अजित पवार यांनी साफ दुर्लक्ष केलं आहे. आमच्याकडे आता 237 आमदार आहेत. त्यामुळे हा रुसला, तो फुगला, याची समजूत काढा, त्याची समजूत काढा याची आता गरज लागणार नाही अशा शब्दात अजित पवारांनी भुजबळांना फटकारलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता अजित पवार विरुद्ध छगन भुजबळ यांच्यात शितयुद्ध सुरू झालं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जेष्ट नेत्यांचा सन्मान केला जाईल. काही तरूण चेहऱ्यांना संधी द्यायची होती. त्यामुळे जुन्या नेत्यांना वगळण्याचा आपल्याला निर्णय घ्यावा लागला असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर भुजबळांनी पलटवार करताना अजित पवारांना काही प्रश्न उपस्थित करत टोले लगावले होते.  तरुणांना संधी द्यायची होती ही चांगली गोष्ट आहे. पण तरुणांची व्याख्या काय असा प्रश्न त्यांनी केला. 67 आणि 68 वर्षांच्यांना तरुण म्हणायचं की नाही अशी विचारणा करत त्यांनी अजित पवारांबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण केलं. असं असेल तर वयाच्या काही तरी मर्यादा टाकणे गरजेचे आहे. असे म्हणत भुजबळांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला होता. 

ट्रेंडिंग बातमी - Crime News: आधी 15 लाख मागितले, मग बॉस सोबत शरीरसंबध ठेवायला सांगितले, पुढे मात्र...

भुजबळांना केंद्रात पाठवले जाईल. राज्यसभा दिली जाईल असंही अजित पवार अप्रत्यक्ष पणे म्हणाले होते. त्यावरही भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती. आता सांगितलं जात आहे तुम्ही राज्यसभेत जा. राज्यसभेत जा म्हणजे विधानसभेचा राजीनामा द्या. पण मी राजीनामा का देऊ असं छगन भुजबळ म्हणाले. आधीच आपल्याला याबाबत कल्पना का देण्यात आली नाही असंही ते म्हणाले होते. भुजबळांची ही आक्रमक भूमिका पाहाता अजित पवार माघार घेतली असे अनेकांना वाटत होते. त्यात भुजबळांनी फडणवीसांची भेट घेत अजित पवारांवर दबाव वाढवला ही होता. पण त्याचा काही एक फरक अजित पवारांवर पडला नाही. 

ट्रेंडिंग बातमी - Vinod Kambli: कांबळीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी थेट पाकिस्तानातून फोन, 'तो' खेळाडू कोण?

अजित पवारांनी छगन भुजबळांचा दबाव आता धुडकावून लावला आहे. त्यांनी आत थेट भूमिका घेतली आहे. विरोधकांकडे अवघे 46 आमदार आहेत. आपल्याकडे 237 आमदार आहेत. त्यामुळे आता पहिल्या सारखी स्थिती नाही. हा रुसला, तो फुगला, त्याची समजूत काढ. अशी स्थिती आता राहीली नाही असं थेट अजित पवार म्हणाले. प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल असं ते पुन्हा म्हणाले. प्रत्येकाचा मान राखण्याची जबाबदारी आपलीच आहेत असंही सांगायला ते विसरले नाही. त्यामुळे दबावाचं राजकारण सोडा असाच संदेश अजित पवारांनी भुजबळांना दिला.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com