जाहिरात

Vinod Kambli: कांबळीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी थेट पाकिस्तानातून फोन, 'तो' खेळाडू कोण?

विनोद कांबळी यांनी आपल्याला आपले क्रिकेटमधील काही सहकारी संपर्क करत आहेत असं सांगितलं.

Vinod Kambli: कांबळीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी थेट पाकिस्तानातून फोन, 'तो' खेळाडू कोण?
ठाणे:

विनोद कांबळी याची तब्येत खालावली होती. त्यानंतर त्याला ठाण्याच्या Akriti Hospital मध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याच्या प्रकृतीची विचारपूर करण्यासाठी काही क्रिकेटपटूनी त्याच्या बरोबर संपर्क केला होता. त्यात भारतीय क्रिकेटपटूंबरोबरच पाकिस्तानी क्रिकेटपटूंचाही समावेश होता. आपल्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आपल्याला थेट पाकिस्तानातून फोन आला होता असं विनोद कांबळीनेच सांगितलं. शिवाय तो खेळाडू कोण हे ही त्याने स्पष्ट केलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विनोद कांबळी यांचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या अनावरणाचा कार्यक्रम  तेंडुलकर कांबळी ही जोडी एकत्र दिसली होती. या कार्यक्रमात विनोद कांबळीची तब्येत पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. शिवाय अनेकांनी हळहळही व्यक्त केली. विनोद कांबळीला व्यासपीठावर पाहताच सचिन त्याला भेटायला ही गेला होता. त्याने त्याला हातही मिळवला. क्षणभर हात कोण मिळवत आहे हे विनोद कांबळीला समजलं नाही. पण तो सचिन आहे हे समजल्यानंतर कांबळी प्रचंड खूश झाला होता. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती विनोद कांबळीच्या आजाराबाबतची आणि त्याच्या तब्येतीची. 

ट्रेंडिंग बातमी - Vinod Kambli Hospitalized : विनोद कांबळीची प्रकृती ढासळली, ठाण्यातील रुग्णालयात दाखल

विनोद कांबळीने त्यानंतर आपल्या आजाराबाबत खुलासा केला होता. त्याला युरीनचा त्रास आहे. शिवाय त्याला पायाला क्रॅम येतात हे पण त्यांनी सांगितले. त्याला उपचाराची गरज होती. पण सध्याची आर्थिक स्थिती किती नाजूक आहे हे पण त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर कपील देव, सुनिल गावस्कर यांनी त्याच्या उपचाराची जबाबदारी घेत असल्याचं सांगितलं होतं. त्यासाठी रिहॅबमध्ये जावं लागेल अशी अटही ठेवली होती. त्यासाठी विनोद कांबळी तयारही झाला होता. मात्र त्यांना पुन्हा शनिवारी त्रास होवू लागला. त्यामुळे त्यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

नक्की वाचा - बोलणंही होतं कठीण तरीही गाणं गाऊन विनोद कांबळीने जिंकले मन, खास मित्र तेंडुलकरने वाजवल्या टाळ्या

यावेळी विनोद कांबळी यांनी आपल्याला आपले क्रिकेटमधील काही सहकारी संपर्क करत आहेत असं सांगितलं. अजय जडेजाचे नाव त्यांनी आवर्जुन घेतलं. त्यांनी त्यांनी आपल्याला पाकिस्तानमधूनही फोन आला होता असं सांगितलं.पाकिस्तानचे खेळाडूनही आपल्या तब्येतीची विचारपूस करत असल्याचं सांगितलं. त्यात शोएब अख्तरने आपल्याला फोन केला होता, असं विनोद कांबळी यांनी सांगितलं. आपल्यावर प्रेम करणारे लोक आपली विचारपूस करत आहेत त्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला. 

ट्रेंडिंग बातमी - Crime News: आधी 15 लाख मागितले, मग बॉस सोबत शरीरसंबध ठेवायला सांगितले, पुढे मात्र...

दरम्यान Akriti Hospital च्या डॉक्टरांनी विनोद कांबळींची तब्बेत आता स्थिर असल्याचे सांगितले. शिवाय ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचेही सांगितले. त्यांच्या पायाला क्रॅम येत होते. ते आता कमी झाले आहे. त्यांच्या सर्व तपासणी करण्यात आल्या आहेत. पुढील दोन ते तिन दिवसात त्यांना घरी सोडलं जाईल असं ही त्यांनी सांगितले. विनोद कांबळी यांनी ही आता आपल्याला चांगलं वाटत आहे. डॉक्टरांनी आपली चांगली काळजी घेतली. आता आपण घरी जावून ख्रिसमस साजरा करणार असल्याचे सांगितले.   

Listen to the latest songs, only on JioSaavn.com