- अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांचा शेवटचा प्रचार व्हिडीओ नुकताच समोर आला आहे
- या व्हिडीओत अजित पवारांनी मतदारांना जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे
- त्यांनी ग्रामिण विकासासाठी काम करणार असल्याचे सांगितले आणि दिलेला शब्द पाळण्याचा निर्धार व्यक्त केला आहे
देवा राखुंडे
अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यात आता अपघाता आधीचा त्यांचा शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यात अजित पवार हात जोडून आवाहन करताना दिसत आहे. शिवाय त्यांनी आपण कसे शब्दाचे पक्के आहोत हे ही सांगत आहेत. मी कामाचा माणूस असल्याचं ही त्यांनी सांगितलं. हा व्हिडीओ तयार केल्यानंतरच अजित पवार बारामतीच्या प्रवासाला निघाले होते असं सांगितलं जात आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी विमानाने जात असताना अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. या आधी मतदारांना आवाहन करण्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता. ज्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेला अजित पवार यांनी मतदानासंदर्भात आवाहन केले होते. त्या व्हिडीओ ते म्हणतात नमस्कार मतदार बंधू भगिनीनो, आपल्या गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा हे ठरवण्याची ही महत्वाची वेळ आहे असं ते म्हणाले.
जिल्हा परिषद हे ग्रामिण विकासाची खरी किल्ली आहे. रोजगार, पाणी, रस्ते, शेती यांच्याशी जोडलेली जिल्हा परिषद ही संस्था आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण भागाशी जोडली गेली आहे. विकासाचा प्रत्येक मुद्दा गांभिर्याने हाताळला आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी कामाचा माणूस आहे. दिलेला शब्द पाळणे ही माझी ओळख आहे असं या व्हिडीओत अजित पवार सांगत आहे. तुमच्यासाठी काम करणार आहे. ग्रामिण भागाच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहे.
शेतीसाठी मदत करण्याचा आमचा मानस आहे. ग्रामीण भागापर्यंत जास्तीत जास्त विकास पोहोचवणार आहोत. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला साथ द्या, संधी द्या, मी तुमच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही असं ही ते म्हणाले. तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही हा माझा शब्द आहे. निवडणुकीत घडाळ्याचं बटण दाबा. गावाच्या समृद्धीसाठी तुमचं एक मत महत्वाचं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला साथ द्या असं ही ते यावेळी म्हणाले. त्यांचा हा शेवटचा व्हिडीओ ठरला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world