- मोसीन शेख, प्रतिनिधी
Ajit Pawar Plane Crash: राशपचे आमदार रोहित पवार उपमुख्यमंत्री आणि काका अजित पवार यांच्या अपघातासह राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणापर्यंत वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्यावर 9 फेब्रुवारीनंतर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी म्हटलं की,"राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस असून कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीच्या प्रचारासाठीच विमानाने जात असताना काळाने घाला घातला. त्यांच्या विचारांना आदरांजली वाहायची असेल तर तर सर्वांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आशीर्वाद द्यावा".
पवारसाहेब (शरद पवार) नेहमीच कुटुंबाचे केंद्रबिंदू राहिलेले आहेत. परिवारासमोर जेव्हा-जेव्हा अडचणी आल्या तेव्हातेव्हा पवारसाहेब उभे राहिले आहेत. दादा नसताना पवार साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला मिळतंय, असेही रोहित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार स्मारक कुठे होणार?
"अजितदादांचं चांगलं स्मारक व्हावं ही सर्वांची इच्छा आहे, त्याची पाहणी आम्ही आज केली आहे. एक चांगलं म्युझिअम दादांचं व्हावं, ते बारामती शहरात असावं की आणखी कुठे असावं? याबाबत काही दिवसात निर्णय पवार कुटुंब घेईल", अशी माहिती रोहित पवारांनी दिलीय.
(नक्की वाचा: Sunetra Pawar News: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय भूमिका मांडणार? 9 फेब्रुवारीकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष)
पवार कुटुंब एकत्र येणार?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, "खरंतर काही दिवसापासून परिवारात राजकीय चर्चा झालेली नाही. 9 फेब्रुवारीनंतर मी स्पष्टपणे बोलेन. दादांची इच्छा काय होती? विलीनीकरण होईल की नाही होईल? यावर भाष्य करायला मी एवढा मोठा नाही. चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे, ती ऐकून दुःख वाटतं. चर्चा दुसरीकडे भरकटच चालली आहे, त्याला राजकीय स्वरूप दिलं गेलं आहे"
रोहित पवारांच्याही मनात अपघाताबाबत शंका?
अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातही 9 फेब्रुवारीनंतर बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विमानात काय घडलं? काय नाही घडलं? याबाबत सर्व माहिती जनतेसमोर आली पाहिजे. काही अनुत्तरित प्रश्न आहेत ते आम्ही सरकार केंद्र सरकार, विमान कंपनी या सर्वांना विचारू.
राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस असून कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीच्या प्रचारासाठीच विमानाने जात असताना काळाने घाला घातला आणि मा. अजितदादांना आपल्यातून हिरावून नेलं. या दुःखद घटनेमुळं नियोजन करुनही पवार कुटुंबाला कोणत्याही उमेदवाराच्या… pic.twitter.com/LzUcaG6QrA
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 5, 2026
(नक्की वाचा : Ajit Pawar Tattoo Video: निव्वळ प्रेम आणि निष्ठा! तरुणाने छातीवर काढला अजित पवारांचा टॅटू)
पवार कुटुंबातील दुरावा दूर होणार?राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, "राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा काकीच राहाव्या, ही सर्वांची इच्छा आहे. या गोष्टी आम्हाला दुःखद काळात बोलता येत नाहीत". दरम्यान "कुटुंबीयांकडून पत्रकार परिषदेसंदर्भात परवानगी घेतलेली नाही. माझी बोलण्याची इच्छा आहे. परवानगी मिळाली तर मुंबईत 9 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेईन", असेही त्यांनी स्पष्ट केलंय
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world