महायुतीचा मुख्यमंत्री कोण याच्यावर उद्या म्हणजेच गुरूवारी दिल्लीत अंतिम निर्णय होईल. ही चर्चा खेळीमेळीच्या वातावरणता होईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल असंही ते म्हणाले. त्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील असंही सांगितलं. त्यामुळे नव्या सरकारचा फॉर्म्युला काय असेल हेच त्यांनी सांगून टाकले आहे. त्यामुळे नव्या सरकारमध्येही दोन उपमुख्यमंत्री असतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र यावर दिल्लीत अंतिम निर्णय होईल असंही त्यांनी सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्रातल्या जनतेने जो निकाला दिला आहे त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. दिल्ली महायुतीच्या नेत्यांची उद्या गुरूवारी बैठक होत आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आपण जात असल्याचे अजित पवारांनी सांगितले. त्यामुळे पुढील चर्चाही दिल्लीत होईल. नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील असंही ते म्हणाले. त्यानंतर नागपूर इथे अधिवेशन असणार आहे. त्याचीही तयारी करावी लागणार आहे. पुरवणी मागण्या मंजूर करायच्या आहेत. त्यामुळे कामाचे प्रेशर असेल असंही ते म्हणाले. पण यासर्वाचा अनुभव असल्याने कोणती अडचण येणार नाही हे ही त्यांनी स्पष्ट केलं.
ट्रेंडिंग बातमी - शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला, मोदी- शाहांचा निर्णय मान्य करणार
दरम्यान मागिल वेळी संख्याबळाची स्थिती वेगळी होती. मात्र आता तशी स्थिती नाही. इथे संख्याबळाला अधिक महत्व आहे असं सांगत त्यांनी मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल असं त्यांनी अप्रत्यक्ष पणे सांगितलं. कार्यकर्त्यांना आपण मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं. पण त्यांना काही वाटेल. ज्याचे नंबर जास्त त्याचा मुख्यमंत्री हे सरळ आहे असंही ते म्हणाले. दरम्यान दिल्लीला इतर पक्षाच्या प्रमुखांना भेटणार असल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले. पुढच्या दोन दिवसात राज्यात नवं सरकार अस्तित्वात येईल असे संकेतही त्यांनी दिले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - 'एकनाथ शिंदे इतके दिवस गप्प का होते?' काँग्रेसचा एक सवाल अन् अनेक शंका
दरम्यान विधानसभेचा निकाल हा अगदीच एकतर्फी लागला. इतका एकतर्फी निकाल या आधी कधीच लागला नव्हता. हा एक नवा विक्रम आहे. या आधी काँग्रेसला 200 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर येवढे मोठे यश कोणालाही मिळाले नाही. त्यामुळे मतदारांचे धन्यवाद मानतो असेही ते म्हणाले. या विजयाने आमच्यावरील जबाबदारी वाढली असल्याचेही ते म्हणाले. राज्याचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आमची असल्याचेही ते म्हणाले. शिंदेंच्या वाट्याला काय येणार आहे हे आपल्याला माहित नाही. त्याबाबतचा निर्णय ते घेतली. आमच्याबाबतचा निर्णय आम्ही घेवू असे अजित पवार म्हणाले.