'कांद्याने आम्हाला रडवलं, हलक्या कानाचे राहू नका' अजितदादांची जोरदार फटकेबाजी

हलक्या कानाचे राहू नका हे सांगताना, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना कांद्याने आम्हाला कसे रडवले हे सांगायला अजित पवारांनी मागे पुढे पाहिले नाही.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

महायुतीने मुंबईत विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. षण्मुखानंद सभागृहात झालेल्या संयुक्त मेळाल्यात हे रणशिंग फुंकले. शिवाय विधानसभा निवडणुकीत महायुतीची रणनिती काय असेल याचीही चुणूक या मेळाव्यातून दिसली. अजित पवारांनी या मेळाव्यात जोरदार फटकेबाजी करत, लोकसभेला का हरलो याची कारणमीमांसा केली. शिवाय महायुतीच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्याही दिल्या. हलक्या कानाचे राहू नका हे सांगताना, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना कांद्याने आम्हाल कसे रडवले हे सांगायला अजित पवारांनी मागे पुढे पाहिले नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'कांद्याने आम्हाला रडवलं' 

लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश महायुतीला मिळाले नाही. आमचा जो अंदाज होता तो खरा ठरला नाही असे अजित पवार म्हणाले. विरोधकांनी जो अपप्रचार केला त्याचाही फटका बसला असेही पवार म्हणाले. पण कांद्यांनी आम्हाला अनेक ठिकाणी रडवलं हे नाकारून चालणार नाही. त्याचा फटका पुणे नाशिक आणि अन्य ठिकाणी बसला. त्यामुळे कांद्यावरची निर्यात बंदी उठवा अशी जाहीर पणे मागणी अजित पवारांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली. विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे निर्णय घ्या असेही ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत' सुनेत्रा पवारांची इच्छा काय?

'हलक्या कानाचे राहू नका' 

विधानसभा निवडणुकीत जो उमेदवार सक्षम असेल त्यालाच उमेदवारी दिली जाईल असे पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दुसऱ्याने नाराज होण्याची गरज नाही. त्यानेही जो उमेदवार असेल त्याचे काम करावे असे आवाहन यावेळी अजितदादांनी केले. शिवाय हलक्या कानाचे राहू नका असा सल्लाही दिला. हलक्या कानाचे राहू नका. हा असं असं म्हणत होता. आता याला तिकट मिळालं आहे. तो म्हणत होता वरून तिकीट मिळालय. आता वरून नाही. खालून नाही. मधून नाही. पक्षाच्या प्रमुखांवर फक्त विश्वास ठेवा.असे थेट पणे अजित पवार म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - फैसला होणार? धनुष्यबाण कोणाला मिळणार? घड्याळाची टिकटिक बंद होणार?

'योजना घराघरा पर्यंत पोहचवा' 

सरकारने चांगल्या योजना आणल्या आहे. त्या पैकी एक म्हणजे लाडकी बहीण योजना आहे. या योजने मुळे विरोधक घाबरले आहेत. ही योजना अपयशी व्हावी असे त्यांना वाटत आहे. सिलेंडरही आपण फ्रि देत आहोत. त्याबाबतही चुकीची माहिती पसरवली जाईल. त्याला तुम्ही त्याच पद्धतीने उत्तर द्या असे अजित पवार यांनी सांगितले. विकासाच्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढू या. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी  पडू नका. असेही ते म्हणाले. स्थानिक पातळीवर महायुतीचे कार्यकर्ते  एकदिलाने काम करा असा सल्लाही त्यांनी दिला. समन्वय ठेवा. महायुतीची बदनामी होईल असे वक्तव्य करू नका असेही त्यांनी सांगितले. 

Advertisement
Topics mentioned in this article