मुख्यमंत्री होण्याची अजित पवारांची महत्वकांक्षा कधीही लपून राहीलेली नाही. त्यांनाही राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. हीबाब त्यांनी जाहीर पणे बोलूनही दाखवली आहे. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. महायुतीम्हणून अजित पवार शिवसेना शिंदे गट आणि भाजप बरोबर निवडणुकीला सामोरीही जाणार आहे. निवडणुकीनंतर कोणाचे सरकार येईल यावर अंदाज बांधले जात आहेत. अशात आता मुख्यमंत्री कोणी व्हावे या प्रश्नाला सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'मुख्यमंत्री व्हावे ही इच्छा'
महायुतीत मुख्यमंत्री पदाचे तीन दावेदार आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. हे तेघेही आपल्याला मुख्यमंत्री पदाचे दावेदार समजत आहेत. प्रत्येक नेत्याच्या पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांनीच मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. या पार्श्वभूमीवर खासदार सुनेत्रा पवार यांना काय वाटते हे पत्रकारांनी जाणून घेतले. अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी बारामतीकरांची इच्छा आहे असा प्रश्न सुनेत्रा पवार यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांची ही इच्छा पुर्ण होवो असे उत्तर दिले. शिवाय तसे साकडे आपण घालू असेही त्या म्हणाले. तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत त्यांनी केले. त्यावेळी त्या पत्रकारां बरोबर बोलत होत्या.
ट्रेंडिंग बातमी - फैसला होणार? धनुष्यबाण कोणाला मिळणार? घड्याळाची टिकटिक बंद होणार?
मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोण?
महायुतीचा चेहरा नक्की कोण असणार हे अजूनही स्पष्ट नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार हे आधी सांगितले गेले होते. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत संयुक्त पणे निवडणुकीला सामोरे जा असा संदेश दिला गेला. त्यामुळे महायुतीचा चेहरा कोण हे अजूनही निश्चित नाही. अशा वेळी तिनही नेते जास्तीत जास्त आमदार आपलेच निवडून यावेत यासाठी प्रयत्न करतील हे निश्चित आहे.
ट्रेंडिंग बातमी - ‘इलेक्शनमग्न' महाराष्ट्र थोडे ध्यान देईल का? शहाजीराजांच्या समाधीची अवस्था काय?
महाआघाडीचे काय?
एकीकडे महायुतीत तीन तीन जण मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा चेहरा कोण याची ही चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना महायुतीचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. पण ही मागणी मविआचे दोन घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने फेटाळून लावली होती. संयुक्त पणे निवडणुकीला समोरे जाण्याची भूमीका त्यांनी घेतली. आधी महायुतीला हरवू नंतर मुख्यमंत्री कोण हे ठरवू असे ठाम मत मांडण्यात आले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world