जाहिरात
This Article is From Feb 11, 2026

Akola News: सामाजिक न्याय विभागाच्या जाहिरातीतून महापुरुषांचे फोटो गायब, अकोल्यात जोरदार राडा

सामाजिक न्याय विभागाला खडसावताना ही कुणाची जहागिर नाही असं ही त्यांनी सांगितलं.

Akola News: सामाजिक न्याय विभागाच्या जाहिरातीतून महापुरुषांचे फोटो गायब, अकोल्यात जोरदार राडा
अकोला:

योगेश शिरसाट 

सामाजिक न्याय विभागाने आपल्या वेगवेगळ्या योजनांची जाहीरात केली आहे. ही जाहीरात आता नव्या वादा सापडली आहे. अकोला शहरात महाराष्ट्र सरकारच्या शिष्यवृत्ती व विविध योजनांच्या प्रचारासाठी जाहीरत करण्यात आली आहे. ही जाहीरात सामाजिक न्याय विभागाची आहे. या जाहिरातींवर महापुरुषांचे फोटो मात्र गायब असल्याचं समोर आलं आहे. तसा आरोप वंचित  बहुजन युवा आघाडीने केला आहे. या विरोधात वंचिक आक्रमक झाली आहे. 

जुन्या बस स्टँड टॉवर चौक तसेच नवीन बस स्टँड परिसरातील बॅनर लावण्यात आले आहे. हे बॅनर वंचितने काढून टाकले. शिवाय बॅनरचे दहन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, अहिल्यादेवी होळकर आणि रमाई आंबेडकर यांचे फोटो न लावता केवळ राजकीय नेत्यांचा प्रचार केला जात असल्याचा आरोप वंचितने केला आहे. ज्यांच्या नावाने योजना आहेत. त्यांचे फोट का नाहीत असा प्रश्न यावेळी वंचितकडून करण्यात आला आहे. केवळ राजकीय पक्षांची स्वत:ची जाहीरातबाजी सुरू आहे असा आरोप ही त्यांनी केला आहे. 

नक्की वाचा - Dombivali News: 'धुरंधर'चं शुटींग ज्या पुलावर झालं, तो माणकोली पुल पुन्हा चर्चेत, यावेळी कारण काय?

लाखो रुपयांचा खर्च करून सामाजिक न्याय विभागाकडून जाहिराती केल्या जात असतात. मात्र त्या जाहीरातीत महापुरुषांना वगळल्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे. आंदोलनावेळी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणीही करण्यात आली. सामाजिक न्याय विभागाचा हा नायालकपणा असल्याचा आरोप पातोडे यांनी केला आहे. 

नक्की वाचा - Dombivali news: बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला, तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू

सामाजिक न्याय विभागाला खडसावताना ही कुणाची जहागिर नाही. जाहीरातीवर बाबासाहेबांचा फोटो का नाही. शाहू महाराजांच्या नावाची योजना असेल तर त्यांचा फोटो का नाही असा प्रश्न त्यांनी केला आहे. यातून फक्त भाजपचा प्रचार सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जो नालायकपणा चालवला आहे तो बंद करा. नाही तर  सामाजिक न्याय विभागाच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे असा इशारा प्रदेश महासचिवांनी दिला आहे. हे सरकार मनुवादी विचारांचे आहे त्यामुळे हे प्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com