Akola News: 'वंचित'चा 'हिंदू राष्ट्र'सभेचा प्रचार? RSS च्या कार्यक्रमाला वंचितचा पाठिंबा? बॅनरवरून राडा

प्रस्तावित “हिंदू राष्ट्र निर्माण सभे”वरून वाद चिघळला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
अकोला:

योगेश शिरसाट   

अकोला शहरात “हिंदू राष्ट्र जनजागृती सभा”च्या प्रचारावरून राजकीय वातावरण तापले आहे. गोरक्षण मार्गावरील एकवीरा मैदानात आज 3 मे रोजी सायंकाळी होणाऱ्या या सभेत तेलंगणातील वादग्रस्त आमदार टी. राजा सहभागी होणार आहेत. मात्र या सभेच्या प्रचारासाठी लावण्यात आलेल्या होर्डिंग्सवर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी निलेश देव आणि नगरसेवक सुनील इन्नाणी यांची नावे झळकल्याने चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे संघ परिवाराशी संबंधित संस्थांकडून आयोजित या कार्यक्रमाला वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र ही बाब वंचितकडून फेटाळून लावण्यात आली आहे.  

वंचित बहुजन आघाडी पक्षाची विचारधारा आणि या प्रचारामधील विसंगतीमुळे स्थानिक राजकारणात अंतर्गत कलह सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान त्या बॅनरमुळे अकोल्यात वंचितमध्ये हालचालींना वेग आला आहे. या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले असताना वंचित बहुजन आघाडी आंदोलनाच्या पवित्र्यात होती. त्यानंतर मात्र  ते बॅनर वंचितचे नगरसेविक निलेश देव आणि सुनील इन्नाणी या दोन नगरसेवकांची काढली. मात्र काही ठिकाणी तसेच बॅनर असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे .

Advertisement

नक्की वाचा - Success story: एक घर, तीन बहिणी अन् भन्नाट निकाल! सख्ख्या बहिणींचं 12 वीच्या परिक्षेत 'असं' ही रेकॉर्ड

प्रस्तावित “हिंदू राष्ट्र निर्माण सभे”वरून वाद चिघळला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचे सभेला समर्थन असणारे बॅनर शहरात लावण्यात आले होते. यावर वंचित बहुजन आघाडीने तीव्र आक्षेप घेतला. याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केलं की त्यांच्या नगरसेवकांच्या नावाचा वापर विनापरवानगी करण्यात आला होता. यातून पूर्णपणे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. वंचितला बदनाम करण्याचा हा डाव होता असा आरोप ही करण्यात आला आहे. 

नक्की वाचा - Hingoli News: 'नॉन सेन्स! मी जिल्ह्याचा बॉस, मला फोन करू नको' अधीक्षक अभियंत्याची मग्रुरी, Viral क्लिपने खळबळ

या प्रकरणात जबाबदारांवर तात्काळ कारवाई करून बॅनर हटवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. ज्यांच्या नावाने हे बॅनर लावले होते ते, नगरसेवक निलेश देव आणि सुनील इन्नाणी यांनी या सभेशी आपला कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवाय आपल्या नावाचा वापर केल्याचा निषेध ही त्यांनी केला. या सभेत वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असलेले टी. राजा सिंह येणार आहेत. त्यांना वेगवेगळ्या संघटनांकडून विरोध होत आहे.  त्यामुळे हा विरोध लक्षात घेतला प्रशासनासमोर कायदा-सुव्यवस्थेचं आव्हान उभं राहिलं आहे.