मनसेत राडा! अविनाश जाधवांनी पदाधिकाऱ्याला जबर मारहाण केल्याचा आरोप

अविनाश जाधव यांनी आजच मनसेच्या ठाणे पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पालघर:

मनोज सातवी 

विधानसभा निवडणुकीनंतर आता मनसेत जोरदार राडा पाहायला मिळत आहे. मनसेचे ठाणे पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर बोईसरमध्ये मनसेच्या कार्यलयातच जोरदार राडा झाला. यात पालघरचे मनसे प्रमुख समीर मोरे यांच्या भाऊ अतिश मोरे यांना अविनाश जाधव यांनी त्यांच्या समर्थकांसह जबरदस्त मारहाण केली, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या हल्ल्यात अतिश मारे हे जबर जखमी झाले आहेत. अतिश यांना उपचारासाठी तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.     

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनसेच्या अंतर्गत वादातून हा राडा झाला आहे. मनसेच्या व्हाट्सअप ग्रुप वर अविनाश जाधव यांच्या विरोधात पोस्ट करण्यात आली होती. त्याचा राग अविनाश जाधव यांच्या समर्थकांना आला. शिवाय गाडी फोडण्याची भाषाही त्यात करण्यात आली होती. याची माहिती अविनाश जाधव यांना मिळताच त्यांनीही बोईसर गाठल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर ते थेट मनसेच्या कार्यालयात गेले. तिथे अतिश मोरे होते. त्यांना याबाबतचा जाब विचारण्यात आला. 

ट्रेंडिंग बातमी - 'अजितदादा आमच्यात आले नसते तर आम्ही 100 जागा जिंकल्या असत्या' शिंदेंचा शिलेदार थेट बोलला

त्यानंतर कार्यलयातच जोरदार राडा झाला. कार्यलयातील काच अतिश यांना लागल्याचं सांगितलं जात आहे. या मारहाणीत अतिश हे जबर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने  शगुन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र याबाबत अजूनही पोलिस तक्रार करण्यात आलेल नाही. हा हल्ला स्वत: अविनाश जाधव यांनी केल्याचा आरोप मोरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - राज ठाकरेंना मोठा धक्का,  मनसेच्या मोठ्या नेत्याचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

अविनाश जाधव यांनी आजच मनसेच्या ठाणे पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ठाणे पालघरमध्ये पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंना याबाबत पत्र लिहिलं आहे. विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे असे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. त्यानंतर हा हल्ला झाला आहे.  

Advertisement