जाहिरात

Ambarnath News : CM च्या 'इशाऱ्या' नंतरही खेळ सुरूच! अंबरनाथमध्ये महायुतीतील संघर्ष पुन्हा उफाळला

Ambarnath Mahayuti Conflict Escalates: महायुतीमधील महत्त्वाचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील राजकीय कुरघोडी थांबत नाहीय.

Ambarnath News : CM च्या 'इशाऱ्या' नंतरही खेळ सुरूच! अंबरनाथमध्ये महायुतीतील संघर्ष पुन्हा उफाळला
Ambarnath News : भाजपा आणि शिवसेनेतील संघर्ष सुरुच आहे.
अंबरनाथ:

Ambarnath Mahayuti Conflict Escalates: महायुतीमधील महत्त्वाचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील राजकीय कुरघोडी थांबत नाहीय.. मुख्यमंत्री आणि तुमच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकमेकांच्या नेत्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देऊ नका, अशा स्पष्ट सूचना देऊनही अंबरनाथमध्ये पक्षप्रवेशाचे नाट्य सुरूच आहे. यावरून दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला असून, शिवसेना (शिंदे गट) ने 'जशास तसे' उत्तर देण्याचा इशारा भाजपला दिला आहे, तर भाजपनेही कार्यकर्त्यांच्या भूमिकेचे समर्थन करत प्रतिउत्तर दिले आहे.

नेमका वाद काय आहे?

राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यापासून ते थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत महायुतीतील पक्षप्रवेशाचे हे प्रकरण गाजले होते. यानंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत मित्रपक्षांतील नेत्यांना पक्षात न घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अंबरनाथमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना या सूचनांना दोन्ही पक्षांनी हरताळ फासल्याचे दिसून येत आहे.

भाजपने शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी रूपसिंग धल यांना पक्षात प्रवेश दिला. यानंतर काही वेळातच शिवसेना (शिंदे गट) ने भाजपच्या महिला पदाधिकारी रोजलीन फर्नांडिस यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन जशास तसे उत्तर दिले.

( नक्की वाचा : Pune News : खराडी, हडपसर, स्वारगेट ते खडकवासला... पुण्यातील नवा भाग मेट्रोनं जोडणार, वाचा A to Z माहिती )
 

'जशास तसे' उत्तर देण्याचा इशारा

अंबरनाथमधील या घडामोडीनंतर शिवसेना (शिंदे गट) कडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. आम्हीही यापुढे जशास तसे उत्तर देऊ, असा थेट इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे.यावर भाजपकडून नरेंद्र सूर्यवंशी यांनी प्रतिउत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, रोजलीन फर्नांडिस यांना उमेदवारी हवी होती, मात्र न मिळाल्याने त्यांनी दुसऱ्या पक्षात जाणे योग्य नाही. त्यांनी स्पष्ट केले की, नेत्यांची भूमिका नेत्यांनी घ्यावी, पण कार्यकर्त्यांना जे करायचे आहे ते करत राहतील. या विधानावरून भाजप कार्यकर्त्यांच्या कृतीला अप्रत्यक्षपणे समर्थन देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

( नक्की वाचा : Mumbai Local : मुंबईकरांसाठी 'अच्छे दिन'! बदलापूर-कर्जत मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन, रोजचा त्रास होणार कमी )
 

यामुळे, मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचनेनंतरही स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेले हेवेदावे आणि कुरघोडीचे राजकारण थांबलेले नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महायुतीमधील हा तणाव आगामी निवडणुकांमध्ये काय रंग दाखवतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com