Ambarnath News: अंबरनाथ पालिकेच्या समित्यांची निवडणूक बिनविरोध, भाजपला सर्वात जास्त जागा; शिवसेना, NCP चं काय?

अंबरनाथ नगरपालिकेच्या विषय समित्या आणि सभापतीपदांची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली.यावेळी सर्व सभापती बिनविरोध निवडून आले.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ambarnath Municipal Corporation Committees Elections

Ambarnath Municipal Corporation Committees Elections : अंबरनाथ नगरपालिकेच्या विषय समित्या आणि सभापतीपदांची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली.यावेळी सर्व सभापती बिनविरोध निवडून आले.यात भाजपला 3,तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 2 सभापतीपदं मिळाली. बांधकाम समिती सभापतीपदी शिवसेनेचे शैलेश भोईर, शिक्षण समिती सभापतीपदी शिवसेनेच्या रेश्मा गुडेकर, उपसभापतीपदी शिवसेनेच्याच किरण चौबे,नियोजन सभापतीपदी भाजपाचे महेश फुलोरे,महिला बालकल्याण सभापतीपदी भाजपाच्या स्वाती पाटील आणि पाणीपुरवठा सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सुनीता पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

सदाशिव पाटील आरोग्य समितीचे सभापती

तर उपनगराध्यक्ष हे आरोग्य समितीचे पदसिद्ध सभापती असतील,असा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे सदाशिव पाटील हे आरोग्य समितीचे सभापती बनले. मागासवर्गीय समितीच्या सभापतीची निवडणूक गुरुवारी होणार असून त्यासाठी भाजपनं कबीर गायकवाड यांचं नाव निश्चित केलंय. याशिवाय स्थायी समितीच्या 3 नामनिर्देशित सदस्यांचीही निवड करण्यात आली. 10 सदस्यांच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा नगराध्यक्ष असतात.तर प्रत्येक समितीचे सभापती हे स्थायी समितीचे सदस्य असतात. 

Advertisement

नक्की वाचा >> Ratnagiri News: रात्रीच्या अंधारात शिवनदी पात्रात भयंकर घडलं, रत्नागिरीतील चिपळूणमध्ये खळबळ!

तब्बल 7 महिन्यांनी पालिकेला सभापती मिळाला

त्यामुळे 7 सदस्य आपोआप पूर्ण होत असल्यानं उर्वरित 3 सदस्य म्हणून शिवसेनेचे रवींद्र करंजुले, तसच भाजपाचे पवन वाळेकर आणि अनिता भोईर यांची निवड करण्यात आली.या निवडणूक प्रक्रियेत प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं.पालिका निवडणुकीनंतर तब्बल 7 महिन्यांनी पालिकेला सभापती मिळाले असून आता पालिकेचा कारभार अधिक वेगवान होणार असल्याची प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि शिवसेना गटनेते रवींद्र करंजुले यांनी दिली आहे.