भाजपचं ठरलं! 'संघटन हीच शक्ती, मनामनात राष्ट्रभक्ती'

संघटन हीच शक्ती मनामनात राष्ट्रभक्ती ही टॅगलाईन या अधिवेशनाची आहे. त्यामुळे भाजप विधानसभा निवडणुकी पूर्वी आपले संघटन मजबूत करण्यावर भर देणार हे स्पष्ट झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यात होत आहे. या अधिवेशनाची तयारी पुर्ण झाली आहे. संघटन हीच शक्ती मनामनात राष्ट्रभक्ती ही टॅगलाईन या अधिवेशनाची आहे. त्यामुळे भाजप विधानसभा निवडणुकी पूर्वी आपले संघटन मजबूत करण्यावर भर देणार हे स्पष्ट झाले आहे. या अधिवेशनाला केंद्रीय मंत्री अमित शहा हे मार्गदर्शन करणार आहेत. तर राष्ट्रीय आणि राज्यातले प्रमुख नेते या अधिवेशनात उपस्थित राहतील. विधानसभा निवडणुकीची दिशा काय असेल हे या अधिवेशनातून स्पष्ट होणार आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे हे अधिवेशन होत आहे. याला राज्यातील पाच हजार पेक्षा जास्त  कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवनकुळे दिली आहे. अमित शहा यांच्या बरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश हे नेते अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.

ट्रेंडिंग बातमी -  'विधानसभा निवडणूक महायुतीच्या नेतृत्वात लढणार'; चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. असेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. शिवाय विधानसभा निवडणूक प्रचार आणि तयारीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका प्रतिनिधी, पदाधिकारी आदी सहभागी होणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारीही या निवडणुकीत करण्याची भाजपची रणनीती आहे असे बावनकुळे यांनी सांगितले.

(नक्की वाचा-  उद्धव ठाकरेंची विधानसभेसाठीची रणनिती ठरली; संपर्कप्रमुखांना दिले महत्त्वाचे निर्देश)

भाजपच्या या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्ला होता. त्या पार्श्वभूमीवर शहा हे काय भूमीका मांडणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. शिवाय मित्र पक्षां बरोबरची रणनिती काय असेल या गोष्टीही शहा स्पष्ट करतील. विरोधकही त्यांच्या रडारवर असणार आहेत. त्यामुळे ठाकरे आणि पवारांवरही ते काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे. 

Advertisement