राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता आपणच साहेब असल्याचे विधान अजित पवारांनी केले होते. पुण्याच्या खेडमधील शेतकरी मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावरून अजित पवारांना चांगलचं घेरल आहे. मीच साहेब या वक्तव्यावरून कोल्हे यांनी अजित पवारांना चिमटे तर काढलेच, पण महाराष्ट्रात खरे साहेब कोण आहेत यांची नाव सांगत, अजित पवारांना चांगलेच टोले लगावले आहेत. कोल्हे यांनी केलेली ही टिका अजित पवारांच्या जिव्हारी लागणारी आहे. त्यामुळे त्यांच्या या टिकेला अजित पवार काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रवादीत आता आपणच साहेब आहोत. त्यामुळे मीच निर्णय घेणार असे वक्तव्य अजित पवारांनी केले. त्यावर अमोल कोल्हे यांनी बोलताना अजित पवारांना खरे साहेब कोण आहेत हेच सांगितले आहे. आपणच साहेब हे अजित पवारांचे विधान चेष्ठेने केलं असावं. राज्यात साहेब दोनच आहे. एक बाळासाहेब आणि दुसरे शरद पवार साहेब असे अमोल कोल्हे म्हणाले. याची जाणीव अजित पवारांना असेल. फक्त पक्षाचा अध्यक्ष झालं म्हणजे साहेब होणं होत नाही. तर कुणाच्या जिवावर नाही तर स्वत:च्या कर्तृत्वावर उभं रहाणं, संकट आलं म्हणून भूमिका बदलणं, यापेक्षा संकट छातीवर झेलणं म्हणजे साहेब. असं म्हणत अमोल कोल्हेंनी साहेब कोण याची आठवणच अजित पवारांना करून दिली.
ट्रेंडिंग बातमी - 'आम्हाला बांबू लावायचं काम सुरू' सर्वां समोर अजित पवार असं का म्हणाले?
पुण्याच्या खेडमध्ये अजित पवारांनी शेतकरी मेळावा घेतला होता. या मेळाव्यात जो बॅनर लावण्यात आला होता त्यावर खासदार अमोल कोल्हेंचा फोटो ही होता. या वरुन अजित पवारांनी सारवासारव करत अमोल कोल्हेंचा खासदार म्हणून त्यांचा फोटो लावला. तो प्रोटोकॉल आहे असे स्पष्टीकरण दिले होते. त्यावरही अमोल कोल्हे यांनी आपले मत नोंदवलं. अमोल कोल्हेंनी अजित पवारांच्या या विधानावर सवाल उपस्थित करत हा प्रोटोकॉल होता, तर निमंत्रणाचा प्रोटोकॉल का नाही, असा सवाल कोल्हे यांनी केला. शिवाय ज्याने बॅनर छापला त्याचे आभारही त्यांनी यावेळी मागने. दिलीप मोहितेपाटीलांना विधानसभेतुन निवडून आल्यानंतर मंत्रीपद देणार असल्याचे अजित पवारांनी जाहिर केलं यावर खासदार कोल्हेंनी बिरबलाच्या गोष्टीचे उदाहरण देत अजित पवारांना डिवचले
ट्रेंडिंग बातमी - अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीत रासायनिक कंपनीत गॅस गळती
दरम्यान महायुतीची सत्ता आल्यानंतर विद्यमान आमदार दिलीप मोहीते यांनी मंत्री करणार असल्याचे याच मेळाव्यात अजित पवारांनी सांगितलं. यावरही कोल्हे यांनी टोलेबाजी करत अजित पवारांना चांगलचं सुनावलं. महायुतीची सत्ताच येणार नाही. यापूर्वी लोकसभेला अजित पवारांचे पानीपत झालं आहे. विधानसभेला 25 टक्क्याच्या स्ट्राईक रेट प्रमाणे 7 ते 11 जागा आमदार अजित पवारांचे येतील असे त्यांनी सांगितले. त्यामुळे ऐवढ्या आमदारांवर किती जणांना मंत्रीपद मिळणार. त्यामुळे दिलीप मोहिते पाटलांना मंत्रीपद म्हणजे दुरवर दाखवणाऱ्या दिव्याची उब देण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असावा असा टोला त्यांनी लगावला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world