सूरज कसबे, प्रतिनिधी
Saif Ali Khan : चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्यावरील चाकू हल्ल्याचं प्रकरण सध्या गाजतंय. सैफवर मागच्या आठवड्यात राहत्या घरी हल्ला झाला होता. चोरीच्या उद्देशानं हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या प्रकरणातील मुख्य हल्लेखोराला देखील अटक केली आहे. तसंच सैफ अली खानही लिलावती हॉस्पिटमधून घरी परतलाय. आता या सर्व घडामोडीनंतर या प्रकरणाला नवं वळण आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सैफ अली खानवरील हल्ला मला संशयास्पद वाटतो, असं खळबळजनक वक्तव्य मत्स्यपालन आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे. राणे आळंदीमधील हिंदू महोत्सव सभेत बोलत होते. सैफ अलिखानच्या घरात घुसलेले बांगलादेशी होते. त्याच्यावर झालेला हल्ला मला संशयास्पद वाटतो, असं वक्तव्य राणे यांनी केलंय.
राणे इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यानं स्वतचं चाकू मारून घेतला की काय असाही प्रश्न पडतो, असं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं. खान, मलिक यांच्यावर हल्ले झाले तरच बारामतीच्या ताईला पुळका येतो मात्र सुशांत सिंग च्या आत्महत्येवर त्या गप्प असतात अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
( नक्की वाचा : Saif Ali Khan : सैफ अली खानच्या कुटुंबीयांना धक्का, 15 हजार कोटींची संपत्ती सरकार ताब्यात घेणार! )
निरुपम यांनीही व्यक्त केली होती शंका
सैफवरील हल्ला प्रकरणावर शंका उपस्थित करणारे नितेश राणे हे पहिले राजकारणी नाहीत. यापूर्वी शिवसेना नेते संजय निरुपम यांनीही या विषयावर याच पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर सैफ अली खानचा एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, "डॉक्टरांनी सांगितले की चाकू सैफ अली खानच्या पाठीत 2.5 इंच खोलवर घुसला होता. बहुधा तो आत अडकला असावा. त्यानंतर सलग 6 तास ऑपरेशन चालले आणि हे सर्व 16 जानेवारीला घडले. आज 21 जानेवारी आहे.अवघ्या पाच दिवसात हॉस्पिटलमधून बाहेर पडताच एवढा फिट? अवघ्या पाच दिवसात? कमाल आहे!"
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world