'बाळासाहेब थोरातांची भाजपासोबत सेटलमेंट' भाजपा नेत्याचा गौप्यस्फोट

Thorat vs Vikhe : अहमदनगर जिल्ह्यातील विखे विरुद्ध थोरात हा संघर्ष आणखी तीव्र होत आहे. सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांवर धक्कादायक आरोप केला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
शिर्डी:

सुनील दवंगे, प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यातील विखे विरुद्ध थोरात हा संघर्ष आणखी तीव्र होत आहे. लोकसभा निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पराभूत झाले. या पराभवानंतर सुजय विखे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. सुजय विखे पाटील संगमनेर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांची फिरकी घेत त्यांच्या पिताश्रींनी निवडणूक लढवावी, असा टोला सुजय विखे पाटील यांना लगावला होता. थोरातांच्या या टोलेबाजीला सुजय विखे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.  

थोरात इच्छा व्यक्त करणारे कोण? असा सवाल सुजय विखे पाटील यांनी केला. तुमच्याशी लढण्यासाठी वडिलांची गरज नाही. मीच पुरेसा आहे, असा दावा त्यांनी केला. त्याचबरोबर बाळासाहेब थोरात यांची भाजपासोबतच सेटलमेंट असल्याचा गौप्यस्फोट सुजय विखे पाटील यांनी केला आहे.

( नक्की वाचा :  ....फक्त भाजपाचे सरकार, अमित शाहांच्या घोषणेला अजित पवारांचं उत्तर )

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर हा बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून ते तब्बल सात वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. आजवर नेहमीच एकतर्फी विजय मिळवणाऱ्या थोरातांना यंदा मतदारसंघात अडकवून ठेवण्याची रणनिती भाजपानं आखलीय. सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत देत तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. 

सुजय विखे मतदारसंघात सक्रीय झाल्यानं थोरातांनी त्यांची फिरकी घेत त्यांच्या वडिलांना आव्हान दिलं. या प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, सुजय विखे पाटील यांनी उत्तर देताना थोरातांवर भाजपाशी सेटलमेंट असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.