विधानसभा निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी हा सामना रंगणार आहे. त्यामुळे एकमेकाला शह काटशह देण्याचं राजकारण सध्या जोरात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात शरद पवार अजित पवारांना जोरदार दणका देण्याच्या तयारीत आहे. आदिवासी विकास मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे अजित पवारां बरोबर आहेत. त्यांची कन्याच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. काही दिवसां पूर्वीच आत्राम यांनी माझ्या मुलीला मतं मागण्यासाठी आली तर नदीत फेकून द्या असे विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या मुलीने आता मोठा निर्णय घेतला असून ती लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. शिवाय तीच धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम हलगेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश निश्चित समजला जात आहे. 'शिवस्वराज यात्रा' 12 तारखेला गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरीत येत आहे. त्याच वेळी त्या प्रवेश करण्याची शक्यता आहे. या यात्रेत शरद पवार ही उपस्थित राहाणार आहे. शिवाय जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखही उपस्थित असणार आहे. भाग्यश्री यांच्या या निर्णयामुळे धर्मरावबाब आत्राम यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे. भाग्यश्री या आगामी विधानसभा निवडणूक आपल्या वडीलांच्या विरोधात लढवू शकतात अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
नुकतीच जन सन्मान यात्रा गडचिरोलीत आली होती. त्यावेळी अजित पवारही उपस्थित होते. त्याच वेळी धर्मरावबाब आत्राम यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवी होती. जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमची काय होणार? ती आणि तिचा नवरा मतं मागायला तुमच्या दारात आला तर त्यांना नदीत फेकून द्या असं वक्तव्य त्यांनी केली होतं. शिवाय एक मुलगी गेली तर काय झालं एक मुलगी आणि मुलगा माझ्या बरोबर आहे असंही ते म्हणाले होते. यावर अजित पवारांनीही घर फोडू नका. ते लोकांना आवडत नाही. त्याचा अनुभव घेतला असल्याचे बोलले होते.
ट्रेंडिंग बातमी - हर्षवर्धन पाटील लढणार की माघार घेणार? इंदापूर विधानसभा कोणाच्या पारड्यात?
भाग्यश्री आत्राम हलगेकर या राजकीय जिवनात गडचिरोलीत सक्रीय आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे. शिवाय त्या बांधकाम सभापती ही राहील्या आहेत. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर धर्मरावबाबा आत्राम हे अजित पवार गटात गेले. पण त्यांची मुलगी कुठेही गेली नाही त्यांनी आता शरद पवारांची साथ देण्याचे ठरवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्याच आपल्या वडीलांच्या विरूद्ध मैदानात उतरतील.