राकेश गुडेकर
भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यातील वाकयुद्ध संपण्याचं नाव घेत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणावरून दोघे ही एकमेकांना लक्ष करण्याची संधी सोडत नाहीत. विधानसभा निवडणुकीला गुहागरमध्ये आपल्या आणखी दोन सभा झाल्या असत्या तर भास्कर जाधव यांचा पराभव झाला असता असं वक्तव्य केलं होतं. शिवाय त्यांनी आपले वेळोवेळी पाय धरले होते असं वक्तव्यही रामदास कदम यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा जोरदार समाचार घेत प्रत्युत्त दिलं आहे. शिवाय यावेळी त्यांनी रामदास कदम यांच्याबाबत एक गौप्यस्फोटही केला आहे.
रामदास कदम यांना या निमित्ताने भास्कर जाधव यांनी नवं नाव दिलं आहे. त्यांनी रामदास कदम यांचा उल्लेख 'बामदास छमछम' असा केला आहे. शिवाय कदम यांच्या डोक्यावर परीणाम झाला आहे. तो मूर्ख आहे. हे येडं आहे अशा शब्दात त्यांनी कदम यांना सुनावलं आहे. रोज सकाळी - संध्याकाळ ते उद्धव ठाकरेंवर बोलत असतात. पण रामदास कदम स्वतःच पोराला संपवतोय असा हल्लाबोल ही त्यांनी केला.
मी कधीही रामदास कदम यांच्या पाया पडलो नाही. आई कोटेश्वरीच्या मंदिरात उभा राहा, मी पण येतो, मी कधी पाया पडलो नाही, पण हा माझ्या दोन वेळा पाया पडला. 2009 ते 2014 मध्ये मी मंत्री असताना रामदास कदम यांनी एक दिवस माझे पाय धरले होते. ते ही विधीमंडळाच्या लॉबीत अधिवेशन चालू असताना असं ही त्यांनी सांगितलं. शिवाय मला विरोध करू नको, मी राष्ट्रवादीत येतोय. मला राज्यमंत्रीपद देत आहेत. पण मी कॅबिनेट मागतोय, मला देत नाहीत असं ही कदम यांनी आपल्याला सांगितलं होतं. त्यावर आपण कशाला विरोध करू असं उत्तर त्यांना दिलं होतं असं ही ते म्हणाले.
नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप
रामदास कदम हा वाघ नाही तर हा बिबट्या आहे असं ही ते म्हणाले. नागपूर अधिवेशनात एकदा ते मला भेटले. त्यावेळी रडायला लागले असं म्हणत त्यांनी कदम यांची नक्कल केली. शिवाय माझ्या योगेशदादाला सांभाळा म्हणून त्यांनी आपले पाय धरले असं ही भास्कर जाधव यावेळी म्हणाले. तू माझ्या पाया पडलास, मी तुझ्या पाया पडलो नाही असं थेट जाधव यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी त्यांच्या डान्सबार प्रकरणावर ही वक्तव्य केलं. लाज वाटली पाहिजे तुम्हाला 30 वर्षे बार पत्नीच्या नावावर होता. भडवेगिरीचे पैसे कमावले असा हल्लाबोल त्यांनी केला. तुम्ही गृहराज्यमंत्री होतात तेव्हाही आणि आता मुलगा गृहराज्यमंत्री झाला तेव्हा बार बंद करावासा वाटला नाही असा टोलाही त्यांनी लगावला.