जाहिरात

Bihar Election Results 2025: काँग्रेसमध्ये मोठी फुट अटळ! बिहारच्या निकालानंतर PM मोदींची धक्कादायक भविष्यवाणी

Bihar Assembly Election Results 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतील रा प्रचंड विजयानंतर काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे.

Bihar Election Results 2025: काँग्रेसमध्ये मोठी फुट अटळ! बिहारच्या निकालानंतर  PM मोदींची धक्कादायक भविष्यवाणी
Bihar Election Results 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींनी मोठी भविष्यवाणी केली आहे.
मुंबई:

Bihar Assembly Election Results 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) प्रचंड विजयानंतर काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये लवकरच एक मोठे विभाजन (फूट) होण्याची शक्यता वर्तवली आहे, तसेच काँग्रेसच्या सध्याच्या राजकारणाला 'मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस' (MMC) असे नवे आणि गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे, अशी टीका केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर नवी दिल्लीतील भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांसमोर पंतप्रधान बोलत होते. 

काय म्हणाले PM मोदी?

पंतप्रधान मोदींच्या मते, काँग्रेसचे संपूर्ण राजकीय धोरण केवळ विरोधावर आधारित आहे, ज्यामुळे आता पक्षाच्या आतमध्येच एक वेगळा गट तयार होत आहे. हा गट काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणामुळे अस्वस्थ आहे.

मोदी म्हणाले की, "काँग्रेसचे जे 'नामदार' (वरिष्ठ नेतृत्व) आहेत आणि जे पक्षाला पुढे घेऊन जात आहेत, त्यांच्याविरुद्ध आतल्या आत मोठी नाराजी वाढत आहे. भविष्यात काँग्रेसचा आणखी एक मोठा विभाजन होण्याची शक्यता आहे." त्यांनी आठवण करून दिली की, बिहार निवडणुकीतही त्यांनी (मोदींनी) विरोधकांवर 'तलावात डुबकी मारून स्वतः बुडण्याची आणि इतरांना बुडवण्याची प्रॅक्टिस करत आहेत,' अशी टीका केली होती. काँग्रेसचे सहयोगी पक्षही आता हे ओळखू लागले आहेत की काँग्रेस सर्वांना एकाच वेळी बुडवत आहे.

( नक्की वाचा : Bihar Election Results 2025: अमित शाह यांचा 3 दिवसांचा 'तो' प्लॅन, ज्यामुळे NDA नं मिळवलं ऐतिहासिक यश )
 

'आजची काँग्रेस ही मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस आहे!'

काँग्रेसच्या राजकारणावर कठोर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या राजकारणाचा आधार फक्त विरोध करणे आहे. संसदेचा वेळ वाया घालवणे, कधी ईव्हीएमवर (EVM) प्रश्न उपस्थित करणे, कधी निवडणूक आयोगाला शिवीगाळ करणे, कधी मत चोरीचे मनगढंत खोटे आरोप करणे किंवा जात-धर्माच्या आधारावर देशाला विभाजित करणे, तसेच देशाच्या शत्रूंना पुढे आणणे, हेच काँग्रेसचे धोरण आहे.

"काँग्रेसकडे देशासाठी कोणतीही सकारात्मक दृष्टी नाही. आज मी खूप गंभीरतेने सांगतो की, आजची काँग्रेस ही 'मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस' म्हणजेच MMC बनली आहे," असे गंभीर विधान त्यांनी केले.

 '6 निवडणुकीतही 100 चा आकडा नाही'

बिहारमध्ये NDA ला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या निवडणूक कामगिरीवर जोरदार टोलेबाजी केली. मोदींनी आकडेवारीचा दाखला देत सांगितले की, '2024 च्या निवडणुकीनंतर देशातील 6 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, पण यातही काँग्रेसला 100 जागांचा आकडा पार करता आला नाही.'

इतकंच नाही तर  'आजच्या दिवशी एका निवडणुकीत (बिहारमध्ये) NDA चे जेवढे आमदार निवडून आले आहेत, तेवढे आमदार काँग्रेसने गेल्या 6 निवडणुकीतही जिंकलेले नाहीत.' असं त्यांनी स्पष्ट केलं. 

( नक्की वाचा : Bihar Election Results 2025: बिहारामध्ये 20 वर्षांपासून नितीशकुमार का जिंकत आहेत? 6 कारणांमध्ये दडलंय रहस्य )
 

बिहारचा नवा 'MY' फॉर्म्युला

बिहार निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप मुख्यालयातून बोलताना 'MY' या नव्या फॉर्म्युल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, 'लोखंड लोखंडाला कापते,' अशी एक जुनी म्हण आहे. बिहारमधील काही पक्षांनी तुष्टीकरण करणारा 'MY' फॉर्म्युला (मुस्लिम आणि यादव) तयार केला होता.

पण, आजच्या विजयाने एक नवा सकारात्मक 'MY' फॉर्म्युला दिला आहे, आणि तो म्हणजे 'महिला (Mahila) आणि यूथ (Youth)'. या दोन स्तंभांवर बिहारच्या जनतेने विश्वास दाखवून NDA ला विजय मिळवून दिला आहे. बिहारच्या जनतेने दिलेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, 'बिहारच्या लोकांनी विकसित आणि समृद्ध बिहारसाठी मतदान केले आहे.'

Listen to the latest songs, only on JioSaavn.com