जाहिरात

Nitish Kumar : बिहारमध्ये सरकार बदलण्याच्या हालचालींना वेग; BJP-JDU चा रिव्हर्स फॉर्म्युला नक्की काय आहे?

Bihar Politics Shift: बिहारच्या राजकारणात सध्या मोठ्या आणि ऐतिहासिक उलथापालथी होत आहेत.

Nitish Kumar : बिहारमध्ये सरकार बदलण्याच्या हालचालींना वेग; BJP-JDU चा रिव्हर्स फॉर्म्युला नक्की काय आहे?
Bihar Politics Shift: बिहारमधील सत्तेचा नवा फॉर्म्युला काय आहे?
मुंबई:

Bihar Politics Shift: बिहारच्या राजकारणात सध्या मोठ्या आणि ऐतिहासिक उलथापालथी होत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली आणि याचसोबत बिहारमध्ये नव्या सत्ता समीकरणाची नांदी झाली आहे. उपराष्ट्रपति सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी दिल्लीत अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. या शपथविधीनंतर आता बिहारमध्ये लवकरच मुख्यमंत्री बदलणार आहे. राज्यात  भाजपा आणि जेडीयूमध्ये सत्तेचा एक नवा रिव्हर्स फॉर्म्युला ठरला आहे.

नितीश कुमार यांचा दिल्लीत शपथविधी

नितीश कुमार यांनी आज राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर संसदेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ते यापूर्वीही अनेक वर्षे या वास्तूशी जोडले गेले आहेत. नितीश कुमार आजच पाटण्याला रवाना होणार असून, पुढील काही दिवसांत ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. 

यानंतर भाजपाच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होईल. विशेष म्हणजे, नितीश कुमार मोदी सरकारमध्ये मंत्री होणार नसून, ते केवळ राज्यसभा सदस्य म्हणून राहतील आणि राज्य सरकारला मार्गदर्शन करत राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या अनुभवाचा संसदेला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

( नक्की वाचा : Dhurandhar 2 मधील दाऊदचं आजारपण खरं की खोटं? वाचा अंडरवर्ल्डच्या पडद्यामागचं सत्य सांगणारा विशेष Review )

आता भाजपा मोठा भाऊ

बिहारच्या राजकारणात आतापर्यंत जेडीयू हा मोठा भाऊ आणि भाजप छोटा भाऊ अशी ओळख होती. मात्र, नव्या करारानुसार आता हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. आतापर्यंत जेडीयूचा मुख्यमंत्री आणि भाजपाचे 2 उपमुख्यमंत्री होते. पण आता नव्या फॉर्म्युल्यानुसार भाजपचा मुख्यमंत्री असेल आणि जेडीयूचे 2 उपमुख्यमंत्री बनतील. मंत्रिमंडळातील जागांचे वाटपही याच रिव्हर्स पद्धतीने होणार आहे. सुमारे साडेचार ते पाच विधानसभा जागांमागे 1 मंत्रीपद असे सूत्र ठरवण्यात आले आहे.

सत्तेचं नवं गणित आणि मंत्रिपदांचे वाटप

नव्या समीकरणानुसार, भाजपचा मुख्यमंत्री आणि 15 मंत्री असतील, तर जेडीयूचे 2 उपमुख्यमंत्री आणि 16 मंत्री असतील. विधानसभेत भाजपचाच स्पीकर कायम राहील, तर विधान परिषदेचे अध्यक्षपद जेडीयूला मिळण्याची शक्यता आहे. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे गृह मंत्रालय भाजपाकडेच राहणार आहे. इतर मित्रपक्ष जसे की एलजेपी (रामविलास), आरएलपी आणि हम यांना पूर्वीप्रमाणेच मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिले जाईल.

( नक्की वाचा : US-Iran War: 15 दिवसांसाठी थांबलं युद्ध...आता इराणनं 40 दिवसांपासून लपवलेलं सर्वात मोठं रहस्य संपणार! )

नितीश कुमारांच्या मुलाकडे मोठी जबाबदारी

या संपूर्ण सत्ता बदलात सर्वात धक्कादायक आणि महत्त्वाची चर्चा म्हणजे नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्या नावाची. सूत्रांच्या माहितीनुसार, निशांत कुमार यांच्याकडे नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. त्यांच्यासोबत जेडीयूचा आणखी एक वरिष्ठ नेता दुसरा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेईल. 

नितीश कुमार यांनी सक्रिय मुख्यमंत्रिपदावरून बाजूला होत आपल्या पुत्राला राजकारणात पुढे आणण्याचा हा मोठा निर्णय असल्याचे मानले जात आहे. नवीन सरकार 2029 ची लोकसभा निवडणूक आणि 2030 ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामाला लागणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com